Essay on beti bachao beti padhao in marathi - बेटी बचाओ बेटी पढाओ वर निबंध लिहा
Answers
भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटून गेली तरीही आजही हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या आणि स्त्री पुरुष भेदभाव सारख्या लज्जास्पद गोष्टी अजूनही समाजात दिसून येतात. आपण २१व्या शतकांत पोहचुनही आजही महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो. महिला ह्या समाजाच्या एक महत्वाच्या घटक आहेत परंतु आजकाल महिलांविषयक गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशाच गुन्ह्यांपैकी एक म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या. वाढत्या स्त्रीभ्रूण हत्येमुळे एकूण लोकसंख्येमध्ये महिलांची आकडेवारी खालावली आहे. खालावत जाणारे लिंग गुणोत्तर आणि समाजाचा समतोल राखण्यासाठी स्त्री भ्रूणाचे संरक्षण करणे हे काळाची गरज बनले आहे, कारण स्त्री आणि पुरुष हे निसर्गाचे एक सामान घटक आहेत.स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि लहान मुलीचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने आणि सामाजिक संस्थांनी खूप अभियाने सुरु केली आहेत. “बेटी बचाओ, बेटी पढाओ” हे अशाच एका अभियानांपैकी एक.
ह्या लेखामध्ये आम्ही “बेटी बचाओ, बेटी पढाओ” ह्या भारत सरकारने सुरु केलेल्या अभियानाबद्दल उपयुक्त माहिती दिली आहे. ही माहिती तुम्हाला “बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियानाबद्दल निबंध, भाषण स्पर्धांमध्ये आणि लेख लिहण्यास उपयुक्त ठरेल. तुम्ही तुमच्या गरजेनुसार ही माहिती पुनर्रचित करू शकता. चला तर मग सुरु करूया.
२२ जानेवारी २०१५ रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ हि योजना केंद्रातील नरेंद्र मोदी शासनाने सुरु केली. ह्या मागचा उद्देश चिमुकल्या मुलींना काही रूढीवादी जल्लादांचा तावडीतून मुक्त करून त्यांना शाळेत शिक्षण देऊन प्रगतीच्या मुख्य सरीत आणणे हे आहे. कित्येक अडाणी लोकांना मुली हा दुसऱ्याचा धन त्याला वाढविण्यात काय फायदा अशी गैरसमज आहे. मुली शिकून काय करतील शेवटी त्यांना चूल आणि मुलं हेच सांभाळायची आहेत, असे मत आहेत.
ह्या रूढी मताला आणि अडाणी विचारांना मात करून जास्तीत जास्त मुली पालकांनी शाळेत पाठवावीत म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ हि मोहीम १०० कोटीच्या अर्थसंकल्पनाशी २०१५ ला भारत शासनाने राबविली. आज मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा खूप कमी झाले आहे. त्यासाठी भ्रूणहत्या हे महापाप कारणीभूत ठरले आहे. ते नष्ट व्हावे आणि कोणत्याही पालकाने आपल्या मुलीस भार समजू नये आणि मुलींच्या माध्यमातून राष्ट्र घडविण्यास त्यांना शाळेत पाठवून आपली आणि समाजाची कायापालट करून घ्यावी ह्यासाठी शासनाणे चालविलेली योजना म्हणजे बेटी बचाओ, बेटी पढाओ. चला आपण संकल्प करूया बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या योजनेला आपण अर्थपूर्ण आणि यशस्वी बनविण्यास सिंहाची कामगिरी करूया.