Essay on chanda माध्यमातून व्यक्तिमत्व विकास in marathi
Answers
होत असतो. या विकासातून तिचा पिंड घडत असतो. व्यक्तिचा हा घडलेला पिंड म्हणजे व्यक्तिमत्व होय. व्यक्तिमत्वाबाबत विशेष माहिती स्पष्ट होण्यासाठी पुढे काही व्याख्या दिल्या आहेत –
व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारिरीक, मानसिक यंत्रणेची संघटना होय.
व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळा बेरीज होय.
व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक उद्दीपन मुल्य.
व्यक्तिमत्वाचा विकास : शरीराचा रंग व ठेवण, बुद्धी इत्यादी गोष्टी घेऊन व्यक्ती जन्माला येते. या गोष्टी तिला आनुवंशिकतेने मिळालेल्या असतात. व्यक्तीकडे असलेल्या उपजत अशा बाबींना जैविक बीजे म्हणता येईल. जीवन जगत असतांना विविध बाह्य घटकांचा, प्रामुख्याने सामाजिक घटकांचा, व्यक्तीच्या विकासावर परिणाम होत असतो. जैविक बीजे आणि बाह्य घटक यांच्यातील आंतरक्रियेचा परिपाक म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्व होय. अर्थात व्यक्तिमत्व विकासात आनुवंशिकता आणि वातावरण या दोन्हीशी संबंधीत घटकांचा वाटा असतो. व्यक्तिमत्व विकासात वाटा असणारे काही घटक पुढीलप्रमाणे –
शरीरचना : काही व्यक्तींना उंच धिप्पाड तर काहींना बुटके शरीर लाभलेले असते, काही व्यक्तींचे शरीर सुडौल आणि व्यंगरहीत असते तर काहींच्या ठिकाणी शारिरीक व्यंगे असतात. व्यक्तीच्या शरीररचेनाचा तिच्या समायोजनावर चांगला अथवा वाईट परिणाम होतो. उत्तम शरीरयष्टी व आकर्षक चेहरा असणाऱ्या व्यक्तींचा चेहरा इतरांवर लवकर प्रभाव पडतो. उत्तम शरीरसंपत्तीच्या बळावर व्यक्ती नेता बनू शकतो.
काही व्यक्ती अतिशय बारीक असतात. लहानपणी मी पण फार हडकुळा होतो. माझे वडील मला नेहमी म्हणत हा एकेरी हाडाचा आहे. त्यामुळे हा बारीक आहे. परंतु सतत १५ वर्ष व्यायाम करून माझे शरीर दुहेरी हाडाचे झाले. म्हणजे एकेरी हाड व दुहेरी हाड हा काही फरक नसतो. हे मला १५ वर्षानंतर कळले. परंतु मला सुचवायचे एकच आहे. माणूस लहानपणी बारीक जरी असेल परंतु योग्य आहार व नियमित व्यायाम यामुळे आपणांस शरीर भारदस्त बनवता येते. यासाठी सर्वांनी नियमित व्यायाम, योगासन व प्राणायाम नियमित करणे अतिशय आवश्यक आहे.
अंतस्त्राव ग्रंथी : कंठपिंडातून जास्त स्त्राव होऊन रक्तात मिसळला तर वर्तनात अस्थिरता व चांचल्य येते. हा स्त्राव कमी झाला तर व्यक्ती सुस्त बनते. वृकस्थ पिंडातील स्त्रावामुळे भावनिक उद्रेकांच्या समयी शरीरव्यापावर ताबा राहतो. जननग्रंथीतील स्त्राव कामवासना वाढवितात. थोडक्यात हे लक्षात घ्यावयास हवे की, व्यक्तिमत्व विकासात अंतस्त्राव ग्रंथीचा महत्वाचा वाटा आहे.
विविध क्षमता : बौद्धिक क्षमतेचा व्यक्तिविकासावर फार परिणाम होतो. ज्या गोष्टी तैल बुद्धीच्या व्यक्ती सहज