India Languages, asked by afibeig1803, 3 months ago

Essay on Coronavirus in MARATHI.
....PLEASE I NEED IT URGENTLY​

Answers

Answered by kanikaend
2

Explanation:

ठळक मुद्दे चला तर या कोरोना विषाणूच्या निमित्तानं का होईना आपणा सर्वांना आपल्या भारतीय संस्कृतीची आठवण झालीभारतीय संस्कृतीतील अनेक गोष्टींचे आपण जर व्यवस्थित आचरण केले तर भविष्यकाळात येणाºया अशा अनेक विषाणूंवर आपण मात करू

मागील दोन ते तीन आठवड्यांपासून आपणा सर्वांना कोरोना विषाणूमुळे होणाºया कोविड-१९ या आजाराने भयभीत करून सोडले आहे. मला खात्री आहे की लवकरच या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रतिबंधक लसाची आणि त्यावरील उपचारासाठी लागणाºया औषधांचा शोध होऊन त्याची निर्मिती सुरू होईल आणि सर्व काही सुरळीत होईल.

 जसं प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे माझ्या दृष्टीने या कोरोना विषाणूने त्याचे दोन्ही बाजू आपणास दाखविल्या आहेत. एका बाजूने तो जरी आपणास शाप ठरत असताना, त्याची दुसरी बाजूही पाहणे अत्यंत गरजेचे आहे. मी त्या दोन्ही बाजूंचा विचार करूनच हा लेख लिहित आहे. मागील तीन आठवडे मी जेव्हा या भयानक कोरोना विषाणूवर विचार करीत आहे तेव्हा मला अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. त्यापैकी मी काही गोष्टी मांडत आहे. या कोरोना विषाणूने मात्र जगातील सर्व मनुष्यजातीला काही प्रचंड शिक्षा आणि शिकवण व बºयाच गोष्टींची आठवण करून दिली आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. 

या कोरोना विषाणूमुळे आपली भारतीय संस्कृती किती थोर आणि महान आहे याची प्रचिती पावलोपावली येत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा कोरोना विषाणू आपणास बाहेरून घरात आल्यानंतर हात आणि पाय स्वच्छ धुवायला भाग पाडत आहे. वापरलेले कपडे व्यवस्थित खुंटीवर ठेवण्यास भाग पाडत आहे. जेव्हा दोन व्यक्ती भेटतात तेव्हा त्यांना दोन्ही हात जोडून नमन करण्यासाठी नमस्कार करावयास भाग पाडत आहे. दोन व्यक्तींमध्ये संभाषण चालू असताना त्यांच्यात एक मीटरचे सुरक्षित अंतर ठेवण्यास भाग पाडत आहे. स्वत:चे, घरातील आणि परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. आपल्या भारतातील काही समाजातील लोक तोंडावर मास्क लावून बोलत असतात, या मास्कचे महत्त्व यानिमित्ताने पुढे येत आहे.

या कोरोना विषाणूमुळे जनतेला स्वत:हून जनता कर्फ्यू पाळून घरात बसवण्यास भाग पाडत आहे. घरातील व्यक्तींशी सुसंवाद करण्यासाठी भाग पाडत आहे. कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र बसून जेवत आहेत, एकत्र बसून स्वत:च्या कुटुंबातील भूतकाळातील अनेक महत्त्वाचे प्रसंग, सुख-दु:खाच्या, मंगलदायी, गमतीजमती यांची उजळणी करावयास भाग पाडत आहे. ज्यांचे आरोग्य कमकुवत आहे त्यांना त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यास भाग पाडत आहे. प्रत्येकास नित्यनियमाने दररोज व्यायाम करण्यास भाग पाडत आहे़ बºयाच व्यक्तींना घरातील खरी परिस्थिती जाणवून देत आहे. गमतीनं का होईना सर्व पुरुष मंडळींना घरात स्त्रियांना मदत करण्यास भाग पाडत आहे. या वरील सर्व गोष्टींचा विचार केल्यास प्रामुख्याने एका गोष्टीची मात्र आठवण होते, ती म्हणजे आपण विसरत जात असलेली आपली भारतीय महान संस्कृती आणि तिचे महत्त्व.

Similar questions