Essay on Dussehra in Marathi
Answers
Explanation:
दसरा हा सण भारतातील सर्वात लक्षणीय आणि प्रदीर्घ असा सण आहे. देशभरातील हिंदू धर्मीय लोक हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने,विश्वासाने,प्रेमाने आणि सन्मानाने साजरा करतात.सारेजण खरोखरच याचा खूप आनंद घेतात. दसरा सणाचा आनंद पूर्णपणे अनुभवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शाळा आणि महाविद्यालये यांना अनेक दिवस सुट्टी दिली जाते . प्रत्येक वर्षी दिवाळीपूर्वी दोन किंवा तीन आठवडे हा सण सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात येतो. या सणाची लोक मोठ्या उत्सुकतेने प्रतीक्षा करत असतात .
आपली संस्कृती आणि परंपरा, मेळे आणि सण यासाठी भारत देश अतिशय प्रसिद्ध आहे. मेळे आणि सण यांचा हा देश आहे, जिथे प्रत्येक सण लोक मोठ्या आनंदाने आणि विश्वासाने साजरा करतात. लोकांना हा सण पूर्णपणे उपभोगता यावा ,तसेच हिंदू सण म्हणून महत्त्व दिले जावे या दृष्टीने भारत सरकारने दसरा हा सण राजपत्रित सुट्टी म्हणून जाहीर केला आहे. दशमुखी दानव रावणावर राजा रामाने मिळवलेला विजय असा दशहरा याचा अर्थ आहे. दशमुखी (दहा डोकी ) दानवाचा या सणाच्या दहाव्या दिवशी केलेला पराभव असा दशहरा या शब्दाचा खरा अर्थ आहे .देशभरातील लोक रावणाच्या प्रतिरूपाचे दहन करून या सणाचा दहावा दिवस साजरा करतात .
देशाच्या वेगवेगळ्या भागांत रूढी आणि परंपरा यानुसार या सणासंबंधित अनेक दंतकथा आहेत. ज्या दसऱ्याच्या दिवशी राजा रामाने रावणाचा वध केला होता, त्या दिवसापासून हिंदू धर्मीय लोकांनी हा सण साजरा करण्यास सुरवात केली. ( म्हणजेच हिंदू कॅलेंडरानुसार आश्विन महिन्याच्या १०व्या दिवशी). माता सीतेचे रावणाने अपहरण केले होते आणि तो तिला रामास परत देण्यास तयार नव्हता, त्यामुळे रामाने रावणाचा वध केला होता .धाकटा भाऊ लक्ष्मण आणि वानर सैनिक हनुमान यांच्या साहाय्याने रामाने रावणाविरुद्ध युद्ध जिंकले होते .
देवी दुर्गेला प्रसन्न करून तिचे आशिर्वाद मिळविण्यासाठी राजा रामाने चंडीहोम केला होता ,असा हिंदू धर्मग्रंथ रामायणांत उल्लेख आहे. अशा प्रकारे युद्धाच्या दहाव्या दिवशी रावणाच्या हत्येचे गुपित जाणून घेतल्यानंतर रामाला विजय प्राप्त झाला होता. अखेर रावणाची हत्या करून त्याने सुरक्षितपणे त्याची पत्नी सीता परत मिळवली . दसरा हा सण दुर्गोत्सव म्हणूनही ओळखला जातो, कारण त्याच दिवशी महिषासुर नांवाच्या दुसऱ्या एका राक्षसाचा दहाव्या दिवशी माता दुर्गेने वध केला होता, असे मानले जाते. राम-लीला मैदानांत ,रामलीला नांवाचा एक प्रचंड मेळा भरतो आणि जवळच्या प्रदेशातील लोक तो मेळा आणि रामलीलेचे नाट्यमय निरूपण पाहण्यासाठी येतात.