essay on ekanishta in marathi
Answers
Answer:
हुंडा आजही एक ज्वलंत समस्या
7 वर्षांपूर्वी
‘हुंडा’ हा दोन अक्षरी शब्द वधूपित्याला कर्जबाजारी करणारा आणि वरपक्षाला मालदार करणारा आणि सुखावणारा शब्द! ‘हुंडा’ हा विषय रूढार्थाने चावून चोथा झालेला विषय असला तरी आज 21व्या शतकातही भारतीय समाजाला पोखरणारी सर्वात ज्वलंत समस्या ठरला आहे; परंतु समाजातील सर्व थरांमध्ये या समस्येबद्दल कमालीची उदासीनता दिसून येते. ही समस्या स्वातंत्र्यानंतर अधिक ज्वलंत बनून त्याची परिणती जरी हुंडा प्रतिबंधक कायदा करण्यात झाली असली तरी आज स्वातंत्र्याच्या 65 वर्षांनंतरही हुंडाबळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
आज आपली पावले जागतिकीकरणाच्या दिशेने पडताहेत. अशा परिस्थितीत सामाजिक परिवर्तनाकडे आपणा सर्वांचेच दुर्लक्ष झाले. मुळात आपला समाज पुरुषप्रधान. म्हणजेच महिलांना दुय्यम स्थान! त्यामुळे महिलांना सर्वाधिक झळ पोहोचविणा-या समस्येकडे, मग त्या समस्येची सामाजिक व्याप्ती कितीही असो, दुर्लक्ष होणारच. 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा करण्यात येतो आणि तरीही आज आपल्या भारत देशात दर तासाला एक नववधू हुंडाबळी होते; पैशाच्या हव्यासापायी मारली जाते आणि तरीही हुंडा देणे-घेणे ही समाजात प्रतिष्ठेची बाब मानली जाते. स्वतंत्र भारताची राज्यघटना लोकांनी लोकांसाठी बनवली आणि स्वीकारली तो दिवस 26 नोव्हेंबर 1949. या घटनेत जरी स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाचा पुरस्कार केला असता तरी प्रत्यक्षात समाजात त्याचा अमल होत नाही. प्रत्यक्ष जीवनात विवाहप्रसंगी मुलीकडची बाजू कनिष्ठ आणि मुलाकडची बाजू श्रेष्ठ, असेच मानले जाते. लग्नात दोन्हीकडचा खर्च; तसेच दागदागिने, भेटवस्तू, मालमत्ता, वरदक्षिणा या आणि अशा अनेक मागण्या वरपक्षाकडून अटीच्या स्वरूपात केल्या जातात. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, पुरेसा हुंडा मिळाला नाही, किंवा मनासारखे मानपान झाले नाहीत या कारणांवरून विवाहित स्त्रियांचा सासरी नव-याकडून, सासूकडून इतर मंडळींकडून छळ होतो. तिला मानसिक, शारीरिक क्लेश दिले जातात. उपाशी कोंडून ठेवले जाते. मारहाण होते, प्रसंगी जाळून खूनही केला जातो. पुरोगामी म्हणविणा-या महाराष्ट्रात आजही दररोज एक हुंडाबळी जातोय. सासरच्या मंडळींकडून आठवड्याला किमान तीन महिलांच्या हत्येचा प्रयत्न होतो, तर या छळाला कंटाळून आणि हुंड्याची मागणी पूर्ण करू शकत नाही म्हणून दररोज पाच महिला आत्महत्या करून स्वत:चे आयुष्य संपवतात. या स्वतंत्र भारतात त्यांना जगण्याचा अधिकार का नाकारला जातो? या प्रश्नाचे उत्तर आम्ही गेली चाळीस वर्षे शोधत आहोत; परंतु अजून सापडलेले नाही.