India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

Essay on first day of rain in Marathi
मराठी निबंध पावसाळ्यातला पहिला दिवस

Answers

Answered by Haezel
45

मराठी निबंध पावसाळ्यातला पहिला दिवस :

पावसाळ्याचे दिवस होते. सगळीकडे हिरवाई होती. सगळे शेतकरी पेरणी करून पावसाची वाट पाहत बसल होते. त्या उन्हाळाच्या कडक दिवसांमध्ये थंड हवा अंगाला स्पर्श करून जाऊ लागली . ढगांनी तो पिवळा रंग सोडून , काळा-राखाडी रंग अंगाला माखला. त्या मोठ्या विशाल ढगांनी सूर्याला झाकून टाकलं , आणि … पावसाचा पहिला थेंब जमिनीवर येउन पडला . सगळी धरतीमाय त्या थेंबांनी ओलीचिंब झाली . सगळी सृष्टी , त्या धारांमध्ये न्हाऊन निघाली . वृक्षांनी तर आंघोळच केली . पक्षी सुखावले. मोर आपला सुंदर पिसारा धरून सुंदर ताल धरून नृत्य करू लागला. सगळे प्राणी पावसात न्हाऊन निघाले. उन आणि पाउस यांचा अप्रतिम मेळ दिसत होता.  सुंदर सप्तरंगी पट्टा हा आकाशाने बांधला होता .हे सुंदर दृश्य बघितल्यावर मन मोहरुन  गेले.  सगळे  गाव निसर्गाच्या विविध रंगांनी न्हाऊन निघाले. पाउस हा खूप आनंददायी होता. असा हा पावसाळ्यातील पहिला दिवस खुपच सुंदर होता .    

Answered by psbisht1
4

Answer:

thank you sending this essay

Similar questions