India Languages, asked by adeb3776, 1 year ago

Essay on Fuel conservation in Marathi
मराठी निबंध इंधन बचत

Answers

Answered by dhanashri69
173
इंधन बचत ही काळाची गरज आहे. इंधनाचे तीन प्रकार आहेत. घनरूप, वायुरूप आणि द्रवरूप असे तीन प्रकार आहेत. आपल्या देशातील इंधनाच्या साठ्याचे प्रमाण मर्यादित असल्यामुळे आपण सर्वांनीच मिळून इंधन बचत केली पाहिजे. जमिनीखालून म्हणजेच खाणीतून किंवा समुद्राच्या तळातून जे खनिज तेल मिळते त्यावर प्रक्रिया करून वेगवेगळ्या प्रकारचे इंधन बनवले जाते. इंधन म्हणजे असा एक पदार्थ आहे की ज्याच्या ज्वलनाने किंवा हालचालीमुळे उष्णता मिळवण्यासाठी उपयुक्त अशी ऊर्जा मिळते. पेट्रोल व डिझेल ही द्रवरूप इंधने आहेत. कोळसा हे घनरूप इंधन आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या भारतात इंधनाचा साठा कमी असल्यामुळे आपल्याला इतर देशातून इंधनाची आयात करावी लागते.

आजकालच्या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रिय जगात खरोखरच ‘इंधन बचत ही काळाची गरज आहे’. या निबंधामध्ये आपण इंधन बचत या विषयावर निबंध पाहणार आहोत. यावरून आपण ‘इंधन बचत’, ‘इंधन बचत काळाची गरज’, ‘ऊर्जा बचत’, ‘इंधन बचत मराठी निबंध’ या विषयांवर मराठी निबंध, लेख लिहू शकतो किंवा भाषण सुद्धा करू शकतो.

इंधन बचत मराठी निबंध, भाषण, लेख

इंधन बचत ही काळाची गरज आहे. इंधनाचे तीन प्रकार आहेत. घनरूप, वायुरूप आणि द्रवरूप असे तीन प्रकार आहेत. आपल्या देशातील इंधनाच्या साठ्याचे प्रमाण मर्यादित असल्यामुळे आपण सर्वांनीच मिळून इंधन बचत केली पाहिजे. जमिनीखालून म्हणजेच खाणीतून किंवा समुद्राच्या तळातून जे खनिज तेल मिळते त्यावर प्रक्रिया करून वेगवेगळ्या प्रकारचे इंधन बनवले जाते. इंधन म्हणजे असा एक पदार्थ आहे की ज्याच्या ज्वलनाने किंवा हालचालीमुळे उष्णता मिळवण्यासाठी उपयुक्त अशी ऊर्जा मिळते. पेट्रोल व डिझेल ही द्रवरूप इंधने आहेत. कोळसा हे घनरूप इंधन आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या भारतात इंधनाचा साठा कमी असल्यामुळे आपल्याला इतर देशातून इंधनाची आयात करावी लागते.

इंधन बचत करताना प्रथम आपण आपल्या घरातील विजेची बचत केली पाहिजे. टी.व्ही.,एसी, लाइट्स, पंखे यांचा वापर करताना काळजी घेतली पाहिजे. आपण त्याजागी उपस्थित असताना त्यांचा वापर केला पाहिजे. विनाकारणच जर आपण या वस्तू चालू ठेवल्या तर वीज वाया जाईल. घरगुती सिलेंडरचा वापर योग्य त्या रीतीने केला पाहिजे. अन्न शिजवताना पातेल्यात किंवा एखाद्या भांड्यात न शिजवता जास्तीत जास्त प्रेशर कुकरचा वापर केला पाहिजे. त्यामुळे गॅसची बचत होईल. स्वयंपाक करताना प्रथम पूर्ण तयारी करून मगच स्वयंपाक केला पाहिजे त्यामुळे गॅस बचत करता येईल. पेट्रोल व डिझेल चा वापर करताना ज्या ठिकाणी आपल्याला जायचे असेल ते जर आपल्यापासून कमी अंतरावर असेल तर आपण गाडीचा वापर न करता पायी जाऊ शकतो किंवा सायकलने जाऊ शकतो. त्यामुळे भरपूर प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलची बचत होईल. जेव्हा आपण सिग्नलला गाडी थांबवतो तेव्हा गाडी बंद केली पाहिजे बरेच लोकं सिग्नलला थांबल्यावर गाडी चालूच ठेवतात. त्यामुळे भरपूर प्रमाणात पेट्रोल डिझेल वाया जाते. गाडी पार्किंगला लावताना गाडीच्या पेट्रोलचा कॉक बंद केला पाहिजे.

इंधन जर संपले किंवा जर आपण त्याचा वापर योग्य रीतीने केला नाही तर. इंधनाशिवाय जगणे खूप अशक्य आहे. आपण जर कल्पना केली की एक दिवस इंधन नसेल तर…. प्रथम सकाळी उठल्यानंतर अंघोळीचे पाणी तापवण्याचा प्रश्न, स्वयंपाक कसा करणार, त्यानंतर शाळेत किंवा कामावर कसे जाणार जर दळणवळणासाठी इंधनच नसेल तर.

इंधन बचतीसाठी आपल्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी जसे की शाळा, कॉलेज, काही सामाजिक संस्था इंधन बचतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात. रॅली काढतात. इंधन हा एक असा पदार्थ आहे की ज्याच्याशिवाय आजच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रिय जगात जगणे मुश्किल आहे. त्यामुळेच तर इंधनाचा वापर आपण काटकसरीने केला पाहिजे आणि इंधन बचत करण्यासाठी हातभार लावला पाहिजे.
Answered by Haezel
144

मराठी निबंध इंधन बचत :

इंधन बचत ही काळाची गरज आहे . घनरुप वायुरुप आणि द्रवरुप हे तीन प्रकारचे इंधन आहेत. इंधन हा असा पदार्थ आहे की ज्याच्या ज्वलनाने उष्णता निर्माण होते. पेट्रोल व डिझल हे द्रवरुप ,कोळसा हे घनरुप इंधन आहे. भारतात इंधनाचा साठा कमी आहे म्हणुन इंधनाची आयात करावी लागते. इंधन बचततीत आपण विजेची बचत करणे , सिलेंडरचा वापर योग्य रितीने करावा, वाहने कमी  वापरावी , सायकलचा वापर करावा . भविष्यात इंधन पुरवठा राहिल का नाही हे सांगता येणे कठीण आहे म्हणुन इंधन बचत करणे गरजेचे आहे.

Similar questions