essay on ganesh chaturthi in marathi
Answers
Answer:
Explanation:
गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व घरामध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली जाते.तसेच दररोज सकाळी व संध्याकाळी गणेश मूर्तीची पूजा आणि आरती केली जाते.काहीठिकाणी आरतीच्या नंतर देवे गायली जातात.तर काही ठिकाणी गणपतीला नैवैद्य दाखवून प्रसादाचे वाटप करण्यात येते.अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तींचे तलाव, नद्या व समुद्रात विसर्जन केले जाते.
गणेश महोत्सव हा सण दहा दिवस साजरा केला जातो.या दहा दिवसात सार्वजनिक गणेश मंडळे विविध स्पर्धा देखावे साजरे करतात व बक्षिसे वितरण केले जातात जेणेकरून समाजामध्ये एकत्र सण साजरा करण्याची प्रथा निर्माण व्हावी आणि सर्व समाज एकत्र यावा.हा उत्सव भारत देशात महाराष्ट्र,कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच विदेशात सुद्धा मोठ्या उत्सहाने साजरा केला जातो.हिंदू मान्यतेनुसार हा दिवस भगवान गणेशाचा जन्मदिवस म्हणूस साजरा केला जातो.
गाथा
गणेश चतुर्थीची गाथा अशी आहे कि एके दिवशी भगवान गणेश आपले आवडते मोदक खाऊन मूषकराजाच्या पाठीवर बसून जात होते.तेंव्हा त्यांच्या वाटेत साप आला व उंदीर घाबरून पडले त्यामुळे गणेश पण उंदराच्या पाठीवरुन खाली पडले.त्यांच्या पोटातील सर्व मोदक पण बाहेर येऊन पडले.तेंव्हा त्यांना पाहून आकाशातील चंद्र तारे त्यांच्या वर हसू लागले.त्यावर गणेशाने चंद्राला शाप दिला कि चतुर्थीला तुझे कोणी दर्शन करणार नाही.
श्री गणेशाची नावे
गणेशाची शंकर व पार्वतीचा पुत्र म्हणून शिवहर,पार्वतीपुत्र अशे नावे पडली आहेत .तसेच द्वैईमतूर असेही संभोधले जाते.विविध ठिकाणी या देवतेचे वर्णन बदलत असले तरी सगळीकडे हिंदू धर्मानुसार हत्तीचे मुख व मनुष्याचे अंग असलेली देवता असेच आहे.या देवतेचे वाहन पुराणामध्ये काही ठिकाणी उंदीर व काही ठिकाणी सिंह वर्णिले आहे.
गणपती हा महाभारत या महान ग्रंथाचा लेखनिक होता.संपूर्ण भारतात गणेश पुज्यनीय असून विशेष करून महाराष्ट्र राज्यामध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
महाराष्ट्रातील गणेशोत्सव
हा उत्सव महाराष्ट्रातील गणपती संदर्भामधील सर्वात मोठा सण आहे.दर वर्षी भारतीय पंचांगानुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्या मध्ये भाद्रपदात महिन्याच्या शुक्ल पक्षापासून सुरु होतो. श्री गणेशाच्या डोक्यावर दुर्वा ठेवल्या जातात.देवाला लाल रंगाची फुले फार आवडतात अशी आख्याईका आहे त्यामुळे देवाला लाल फुलांचा हार घातला जातो. मोदक तयार करून नैवद्य म्हणून देवाला दाखवले जातात.त्यानंतर गणेश आरती गायली जाते व सर्वाना गणपतीचा प्रसाद वाटप केले जाते.