India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

Essay on garden in Marathi: (मराठीमध्ये बाग वर निबंध)

Answers

Answered by Mandar17
113

घराच्या अंगणात, परसात शोभिवंत फुलझाडे, फळझाडे , व भाजीपाला लावुन छान छोटीशी बाग तयार केली जाते . तसेच गच्चीवर ,खिडक्यांमध्ये कुंड्या ठेवुन त्यांत फुलझाडांचे संवर्धन केले जाते. बाग तयार करण्यापूर्वी जागेचा अभ्यास केला जातो. त्यानंतर कोणती फळझाडे, फुलझाडे लावावी ते बघणे. तसेच कोणत्या ऋतुत कोणती झाडे चांगली येतील ते पाहणे. शहरामध्ये जागेअभावी घराच्या गच्चीवर बाग करतात. आपली  ही बाग आपल्याला आनंद देते , उत्साह निर्माण करते. त्याच बरोबर आपल्या घराची शोभा वाढवते. तसेच शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुंदर उद्याने निर्माण केली आहे.

Answered by Hansika4871
60

आमच्या शेजारी राजहंस नावाची बाग तयार केली आहे. नावाप्रमाणे ती राजहंस असून लहान मोठ्यांसाठी ती मनोरंजनाचे साधन ठरली आहे.

मुलांसाठी वेगवेगळे खेळाची उपकरणे आणि मोठ्यांसाठी वाचनालय, हास्य क्लब आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बागेच्या मधोमध एक व्यासपीठ उभारले आहे. बागेमध्ये एक तळे आहे. त्यात छोटे मोठे रंगीत मासे, कासवं सोडली आहेत. मोठमोठ्या झाडांबरोबर रंगीत फुलांचे ताटवे ही मन आकर्षून घेतात.

Similar questions