essay on gramsvachata in marathi
Answers
Explanation:
बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात हे लक्षात घेऊन शासनाने 2000-2001 पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली प्रचंड लोकसहभागाने या चळवळीला लोकचळवळीचे रूप दिले एवढेच नाही तर कोट्यवधी रुपयांची विकासकामे हे लोकसहभागातून करण्यात आणि शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी घराची स्वच्छता आणि अन्नाचे काळजी वैयक्तिक स्वच्छता परिसर स्वच्छता सांडपाण्याचे नियोजन आणि घन कचऱ्याचे व्यवस्थापन आणि मानवी मूल मुत्रची विल्हेवाट यासारख्या विभागात काम करून गावांनी अतिशय उस्फूर्तपणे ग्रामविकासाचा पाया
मजबुत केला
गावातील विद्यार्थी असो की अंगणवाडी सेविका-मदतनीस, सरपंच असो की महिला भगिनी, सर्वांनी या योजनेत भरीव योगदान तर दिलेच परंतु गावाच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासाला गती ही दिली. स्वखुषीने स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या या सर्व लोकांनी गावागावात स्वच्छतेची ग्राम-धून निर्माण केली आणि आरोग्यसंपन्न आणि सुदृढ आरोग्याचा पाया रोवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही
संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार
वर्ष २०००-०१ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१५५ . रुपये (रक्कम लाखात) ७१९.२४
वर्ष २००१-०२ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१५६. रुपये (रक्कम लाखात) ७९७.७०
वर्ष २००२-०३ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१६०. रुपये (रक्कम लाखात) ९००.००
वर्ष २००३-०४ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१६७. रुपये (रक्कम लाखात) ९७५.००
वर्ष २००४-०५ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१६२. रुपये (रक्कम लाखात) ९७५.००
वर्ष २००५-०६ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१५९, रुपये (रक्कम लाखात) ९७५.००
वर्ष २००६-०७ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१७९, रुपये (रक्कम लाखात) १०००.००
वर्ष २००७-०८ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१७७, रुपये (रक्कम लाखात) १०९९.००
बक्षीस क्रमांक प्रथम, पंचायत समिती स्तर २५ हजार, जिल्हा स्तर ५ लाख, विभागीय स्तर १० लाख, राज्य स्तर २५लाख
बक्षीस क्रमांक द्वितीय, पंचायत समिती स्तर १५ हजार, जिल्हा स्तर ३ लाख, विभागीय स्तर ८ लाख, राज्य स्तर २०लाख
बक्षीस क्रमांक तृतीय, पंचायत समिती स्तर १०हजार, जिल्हा स्तर २ लाख, विभागीय स्तर ६ लाख, राज्य स्तर १५लाख
टीप : हा पुरस्कार देणे सरकारने तूर्त बंद केले आहे.