India Languages, asked by erni7882, 1 year ago

Essay on gst in marathi - जीएसटी वर निबंध लिहा

Answers

Answered by singhalseema03p9uwqn
0

वस्तू व सेवा कर {जीएसटी(GST)}: भारतात एक जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी[१]) हा एकच अप्रत्यक्ष कर लागू करण्यात आला. देशभरात एकसमान करप्रणाली असावी असा उद्देश यामागे होता. त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकारद्वारे त्यापूर्वी लागू असलेले अनेक अप्रत्यक्ष कर रद्द करून ही करप्रणाली भारतात लागू करण्यात आली.

जीएसटी लागू करण्यासाठी भारताच्या राज्यघटनेत दुरुस्ती करून नवीन कायदे करण्यात आले.

'गुड्स ॲन्ड सर्व्हिसेस काउन्सिल' ही मध्यवर्ती वैधानिक संस्था जीएसटीचे नियमन करते. केंद्रीय अर्थमंत्री हे या काउन्सिलचे प्रमुख आहेत.

जीएसटी लागू करण्यासाठी ३० जून २०१७ च्या रात्री संसदेचे विशेष अधिवेशन झाले. त्यात राष्ट्रपतींनी मध्यरात्रीच्या सुमारास जीएसटी लागू झाल्याची अधिकृत घोषणा केली.[२] सर्व वस्तू आणि/ किंवा सेवा यांची विक्री, हस्तांतर, वस्तुविनिमय, भाड्याने देणे किंवा आयात ( sale, transfer, barter, lease, or importation) व्यवहारांवर जीएसटी लागू करण्यात येईल [३] असे प्रसारमाध्यमांतून त्यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते.

जीएसटी अंतर्गत १ जुलै २०१७ पासून ०%, ५%,१२%,१८%, व २८% असे कर दर ठरविण्यात आले आहेत.

Answered by Mandar17
0

भारतात अनेक प्रकारचे प्रत्यक्ष कर अस्तित्वात होते. त्या सगळ्या करांना नाहीसे करून एकच अप्रत्यक्ष कर पूर्ण भारत भर लागू करणे हे जीएसटी लागू करण्यामागचा हेतू होता. जीएसटी चा मूळ अर्थ माल आणि सेवा कर असा आहे. २९ मार्च २०१७ ला हा जीएसटी कायदा संसदेत पारित झाला आणि १ जुलै २०१७ पासून हा अमलात आला.  

ह्या जीएसटी चे फायदे अनेक आहेत. जुन्या सर्व करांचे माथेफेडूं चक्र समाप्त झाले, जीएसटी भरणे आणि त्यासाठी नामांकन करणे अगदी सोपे आहे, अनेक प्रत्यक्ष करांचा फिकरा शेवटी ग्राहकांवरच फोडण्यात येत होता आणि हा अतिरिक्त भर ग्राहकांना महागाई वाढ रूपात फेडावं लागत होता. आता जीएसटी ने सगडे प्रत्यक्ष करांना मात केल्यावर वस्तूंची आणि सेवेची किंमत कमी होणार अशी अशा आहे. जीएसटी मुळे अनेक  बेकायदेशीर तंत्रावर ताबा मिळविण्यास पण मदत झाली. एकंदरीत जीएसटी लागू करणे हि वेळेची गरज आणि देशाच्या उन्नतीला हवेशीर पाऊल सिद्ध झाला.

Similar questions