Essay on guru purnima in marathi language
Answers
आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरू पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. महर्षि व्यासांनी महाभारत, पुराणे लिहिली. त्या व्यास मुनिंना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन आहे. त्यांच्या एवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी हिन्दू धर्मात श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, व्यवहारशास्त्र, नीतिशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ व्यासांनी लिहिला.
“गुरुर्ब्रम्हा
गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll”
हा श्लोक आपण रोज प्रात:स्मरणात म्हणतो. ह्यात किती खोल अर्थ दडलेला आहे? गुरू हे प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णु आणि शिव आहेत. ते साक्षात परब्रह्मच आहेत. अशा श्रीगुरूंना मी नमन करतो. असा या श्लोकाचा अर्थ आहे. भक्ताला ज्ञानाची प्राप्ती होते, ती केवळ गुरुमुळेच. त्यामुळे कितीही मोठा माणूस असला तरी त्याला मिळणारे ज्ञान, आत्मज्ञान या सर्वांच्या प्राप्तीसाठी गुरुची आवश्यकता असतेच. म्हणतात ना,
“गुरुविण कोण दाखवील वाट।
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट।।“
आयुष्यात अत्यंत यशस्वी व मोठ्या असणार्या प्रत्येक व्यक्ती त्यांच्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून, पुढे जात मोठ्या झाल्या. अगदी एकलव्याचेच उदाहरण घ्या. गुरुने त्याला नाकारले तरी त्याने आपल्या गुरुंचा पुतळा उभा करून धनुर्विद्येचा अभ्यास केला. या मागचा भावार्थ असा, आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक परिश्रम तर हवेच पण त्याला श्रद्धेची, विश्वासाची जोडही हवी.
हा विश्वास, श्रद्धा आपल्याला गुरुत दिसते. त्याच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते. ही प्रेरणा देणारी व्यक्ती आपला गुरुच आहे. गुरु दत्तात्रयांनी 24 गुरु केले असे म्हणतात. त्यांनी त्यांच्या प्रत्येक गुरुकडून चांगल्या गोष्टी उचलल्या आणि स्वत:ला सिद्धपद प्राप्तीसाठी तयार केले.
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही.
गुरुपौर्णिमा ही सद्गरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस.
गुरू म्हणजे ईश्वराचे सगुण
रूप. वर्ष भर प्रत्येक
गुरु आपल्या भक्तांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात. त्या
गुरूंच्या प्रति अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे, हा गुरुपौर्णिमा
साजरा करण्या मागील उद्देश आहे.
अंध:काराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा गुरू असतो. जो सकल जीवास
चांगले शिकवितो. संस्कार देतो तो गुरू.
आई ही सर्वात पहिली गुरु असते. ती आपल्या मुलाला योग्य संस्कार देते व योग्य मनुष्य बनण्यास मदत करते. नंतर शाळेत शिक्षक. व मनुष्याकरिता आणखी एक महत्त्वाचा गुरू असतो तो म्हणजे निसर्ग. आपण सर्वांना आपल्या या सर्व गुरूंचा सन्मान केला पाहिजे.
गुरु पौर्णिमा हा सण आषाढ महिन्यात येतो. या दिवशी गुरुची आदराने पुजा केली जाते. तसेच या दिवशी आपले गुरु आई-वडिलांची पण पुजा करतात. व्यास ऋषी हे आद्य गुरु आहे. त्यामुळे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा सुध्दा म्हणतात. प्राचीन काळापासुन हा सण मोठ्या श्रध्देने साजरा करतात. गुरु हा ज्ञानाचा सागर असतो. आपण ज्यांच्या कडुन विद्या , ज्ञान घेतो अशा वंदन करायलाच पाहीजे. पूर्वापार ही गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. अनेक अशा गुरुशिष्याच्या जोड्या – द्रोणाचार्य –अर्जुन , कृष्ण-सुदामा इत्यादी.