India Languages, asked by gayatrichaudhari43, 8 months ago

essay on हुंडा - एक अनिष्ट रूढी in Marathi​

Answers

Answered by varsha5160
2

Answer:

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

iplLogoAdaniAstralKhatabook

हुंडा आजही एक ज्वलंत समस्या

7 वर्षांपूर्वी

‘हुंडा’ हा दोन अक्षरी शब्द वधूपित्याला कर्जबाजारी करणारा आणि वरपक्षाला मालदार करणारा आणि सुखावणारा शब्द! ‘हुंडा’ हा विषय रूढार्थाने चावून चोथा झालेला विषय असला तरी आज 21व्या शतकातही भारतीय समाजाला पोखरणारी सर्वात ज्वलंत समस्या ठरला आहे; परंतु समाजातील सर्व थरांमध्ये या समस्येबद्दल कमालीची उदासीनता दिसून येते. ही समस्या स्वातंत्र्यानंतर अधिक ज्वलंत बनून त्याची परिणती जरी हुंडा प्रतिबंधक कायदा करण्यात झाली असली तरी आज स्वातंत्र्याच्या 65 वर्षांनंतरही हुंडाबळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

आज आपली पावले जागतिकीकरणाच्या दिशेने पडताहेत. अशा परिस्थितीत सामाजिक परिवर्तनाकडे आपणा सर्वांचेच दुर्लक्ष झाले. मुळात आपला समाज पुरुषप्रधान. म्हणजेच महिलांना दुय्यम स्थान! त्यामुळे महिलांना सर्वाधिक झळ पोहोचविणा-या समस्येकडे, मग त्या समस्येची सामाजिक व्याप्ती कितीही असो, दुर्लक्ष होणारच. 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा करण्यात येतो आणि तरीही आज आपल्या भारत देशात दर तासाला एक नववधू हुंडाबळी होते; पैशाच्या हव्यासापायी मारली जाते आणि तरीही हुंडा देणे-घेणे ही समाजात प्रतिष्ठेची बाब मानली जाते. स्वतंत्र भारताची राज्यघटना लोकांनी लोकांसाठी बनवली आणि स्वीकारली तो दिवस 26 नोव्हेंबर 1949. या घटनेत जरी स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाचा पुरस्कार केला असता तरी प्रत्यक्षात समाजात त्याचा अमल होत नाही. प्रत्यक्ष जीवनात विवाहप्रसंगी मुलीकडची बाजू कनिष्ठ आणि मुलाकडची बाजू श्रेष्ठ, असेच मानले जाते. लग्नात दोन्हीकडचा खर्च; तसेच दागदागिने, भेटवस्तू, मालमत्ता, वरदक्षिणा या आणि अशा अनेक मागण्या वरपक्षाकडून अटीच्या स्वरूपात केल्या जातात. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, पुरेसा हुंडा मिळाला नाही, किंवा मनासारखे मानपान झाले नाहीत या कारणांवरून विवाहित स्त्रियांचा सासरी नव-याकडून, सासूकडून इतर मंडळींकडून छळ होतो. तिला मानसिक, शारीरिक क्लेश दिले जातात. उपाशी कोंडून ठेवले जाते. मारहाण होते, प्रसंगी जाळून खूनही केला जातो. पुरोगामी म्हणविणा-या महाराष्‍ट्रात आजही दररोज एक हुंडाबळी जातोय. सासरच्या मंडळींकडून आठवड्याला किमान तीन महिलांच्या हत्येचा प्रयत्न होतो, तर या छळाला कंटाळून आणि हुंड्याची मागणी पूर्ण करू शकत नाही म्हणून दररोज पाच महिला आत्महत्या करून स्वत:चे आयुष्य संपवतात. या स्वतंत्र भारतात त्यांना जगण्याचा अधिकार का नाकारला जातो? या प्रश्नाचे उत्तर आम्ही गेली चाळीस वर्षे शोधत आहोत; परंतु अजून सापडलेले नाही.

वरील आकडेवारी खासगी सर्वेक्षणातील नसून, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो या सरकारी विभागाने प्रकाशित केलेल्या अहवालातील ‘क्राइम इन महाराष्ट्र-2012’ या नोंदीतून समोर येते. परंतु या नोंदविलेल्या तक्रारींपेक्षा महिलांवरील छळांचे गुन्हे कैक पटीने जास्त आहेत. मुळात महिलांना स्वत:च्या हक्कांविषयी अनभिज्ञता, अशिक्षितपणा, अनिष्ट रूढी- परंपरा यामुळे त्रास व छळ सहन करावा लागतो. लोकलाजेस्तव आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी अनेक महिला स्वत:वरील अत्याचारांच्या विरोधात गुन्हे दाखल करतच नाहीत. या अहवालानुसार हुंडाबळी प्रकरणात 86% गुन्हेगार पुराव्याअभावी निर्दोष सुटतात. गुन्हा कितीही गंभीर वा क्रूरपणे केलेला असो; पुराव्याअभावी करण्यात आलेले आरोप सिद्ध होऊ शकत नाहीत. आरोपीला संशयाचा फायदा देऊन निर्दोष सोडले जाते. विवाहितेचा छळ पाहिल्याचा प्रत्यक्ष पुरावा न्यायालयासमोर येत नाही. कायदा पुरावा मागतो. पीडित स्त्रीचा छळ उघडपणे इतरांसमक्ष करण्याची शक्यता कमी असते. तसेच ती आत्महत्या कोणाच्या साक्षीने करण्याची शक्यताच नसते. ब-याच वेळेला मृत्यू एखाद्या अपघाताने झाला किंवा ती आत्महत्या होती याचा पुरेसा पुरावा उपलब्ध होत नाही आणि तसा प्रयासही केला जात नाही. अहवालानुसार महाराष्ट्रात 35% गुन्ह्यांचा तपास पूर्ण न झाल्यामुळे कोर्टात आरोपपत्रच दाखल होत नाही. सासरच्या मंडळींकडून छळाच्या ज्या तक्रारी दाखल होतात त्यातल्या दोन टक्के आरोपींनाही शिक्षा होत नसल्याचे आकडेवारी सांगते. या परिस्थितीत पुरुषांना किंवा गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही आणि महिलांना स्वत:च्या हक्कांची/अधिकारांची जाण नाही, असेच म्हणावे लागेल. या अहवालातून आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात आली ती म्हणजे, हुंड्यासाठी छळ आणि हुंडाबळी यासारख्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्यांमध्ये महिलांचे प्रमाण जवळजवळ 25 ते 30% आहे. यावरून ‘स्त्री हीच स्त्रीची शत्रू आहे’ असे म्हटले जाते त्यात नक्कीच तथ्य आहे. महिला संघटनांना कदाचित हे अमान्य असेल, परंतु ही वस्तुस्थिती आहे. लग्न समारंभात समाजामध्ये आपली प्रतिष्ठा वाढावी म्हणून मुलीच्या लग्नात ‘हुंडा’ दिला जातो आणि मुलाच्या लग्नात दामदुपटीने वसूल केला जातो. या प्रथेमुळे कित्येक संसार मोडले, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली.

Similar questions