essay on if sun if it never sets in marathi
Answers
Explanation:
सूर्य मावळला तर काही क्षणात त्याची प्रभा संपते...
इथे हा सूर्य एक तर कधीच मावळत नाही आणि मावळला तरी त्याची प्रभा कधी संपत नाही.. म्हणूनच महाराजांनी त्यांच्या अनुयायांना "मावळा" या नावाने संबोधले..!
पराक्रम ज्यांचा कधीही मावळत नाही तोच मावळा आणि अशा ह्या कधीही न मावळणाऱ्या लोकांचे नेतृत्व करतात तेच छत्रपती सिंहासनाधीश्वर..!
सकाळी निवांत साखरझोपेत असताना सूर्याचे किरण डोळ्यावर पडले. मनात अचानक विचार आला हा सुर्यच उगवला नाही तर किती छान होईल ना. माझी साखरझोप मोडायला कुणी नसेल. दुपारी ती भयंकर उष्णता नसेल.
पण खरच ही खुशखबर असेल का ? आपल्याला रोज सूर्य उगवण्याची सवय झालीये. सूर्य उगवला की सकाळ झाली कळते. घड्याळ पण सूर्याच्या उगवण्या-मावळण्यावर आधारित आहे. जर उजाडलच नाही तर कोंबडे आरवतील का, कुहूकुहू ऐकू येईल का !
सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे सगळीकडे अंधार पसरेल. काहीही दिसणार नाही, पक्ष्यांना उडता येणार नाही, मोर बागडणार नाही. झाडे वाळून जातील. शेतात काही पिकणार नाही. पाऊस पडणार नाही. पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही. उष्णता नाहीशी होईल. दिवसरात्र थंडीच-थंडी वाजेल. सारे निसर्ग चक्र कोलमडून पडेल.
नको-नको ! सूर्य उगवणार नाही ही कल्पनाच मन असह्य करते. हा सूर्य उगवलेलाच पाहिजे.