Essay on if trees could speak in marathi
Answers
Trees could speak in Marathi
trees is the living thing which lives like as we live .But if the life changed when we think that trees speak .........Search it from the web my starting lines are this I have written for you.
■■झाड बोलू लागले तर!■■
एकदा मी एकटीच बाबांसोबत गावी गेले होते.माझ्याबरोबर खेळायला कोणीच नसल्यामुळे मला खूप कंटाळा येऊ लागला.मग मी जवळच्या बागेत जायचा विचार केला.तिथे एका झाडाखाली मी झोपून राहिलेली,तेव्हा मनात विचार आला,जर हे झाड बोलू लागले तर!
तर ते म्हणेल, "मुली कशी आहेस? मी तुझाच मित्र बोलत आहे.तुझ्या पणजोबांनी या ठिकाणी बी रुजवली होती.तेव्हा माझा जन्म झाला. त्यांनी मला वाढवले. मला खूप संभाळले.आता मी खूप मोठा झालो आहे.
माझ्या अंगावर पक्षी बसतात.तुम्ही मुले माझ्या सावलीत बसतात.तेव्हा मला खूप बरे वाटते.मी तुम्हाला फळे व फुले देतो.माझ्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन मिळतो.माझ्यामुळे वातवरण थंड राहते.माझ्यामुळे पाऊस पडतो.हवा शुद्ध राहते.
मी तुमची इतकी मदत करतो,पण तरीही तुमच्यातले काही लोक माझ्याशी व माझ्या कुटुंबाशी फार वाईट वागता.आम्हाला तुम्ही तोडता.जर आम्ही नसलो,तर तुमचे खूप नुकसान होईल.
तुम्हाला शुद्ध हवा मिळणार नाही.जमीन कसदार राहणार नाही.पाऊस नाही पडणार.प्रदूषण वाढेल.तेव्हा आमची काळजी घेत जा".एवढ्यातच माझ्या अजोबांनी मला हाक मारली,मी पटकन माझ्या विचारांच्या दुनियेतून बाहेर पडले.