India Languages, asked by Zafar8014, 11 months ago

Essay on importance of exercise in Marathi language

Answers

Answered by tarun8999
2

Answer:

शारीरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी क्रिया म्हणजे व्यायाम.

नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवण्यास मदत होते. व्ययामाने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही छान राहते.

नियमित व्यायामामध्ये; ताणण्याचे व्यायाम, एरोबिक्स व श्वासाचे व्यायाम यांचा समावेश असावा.व्यायाम केल्याने माणसाला नवीन उर्जा प्राप्त होते.व्यायाम हा कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकतो. बैठे व्यायामही करता येतात.

==व्यायामाचे प्रकार== (type of yoga) १. ताणण्याचे व्यायाम

उदा. योगासने, सूर्यनमस्कार

२. एरोबिक्स (रक्ताभिसरणाचे) व्यायाम

उदा. चालणे, धावणे, जॉगिंग, नृत्य, पोहोणे, सायकल चालविणे

३. श्वासाचे व्यायाम

उदा. प्राणायाम

४. शक्तिचे व्यायाम

उदा. वजन उचलणे व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.यामुळे माणूस आनंदी रहातो. व्यायामामुळे आपली मानसिक तसेच शारीरिक शक्ती वाढते. लहान मुलांमध्ये वाढणारा लठ्ठपणा हि सध्याची गंभीर जागतिक समस्या आहे आणि व्यायामामुळे हि समस्या कमी होण्यास मदत होते.

Explanation:

  1. वजन नियंत्रित राहण्यास मदत
  2. शारीरिक क्षमते मध्ये वाढ
  3. नैराश्याचे प्रमाण कमी होणे
  4. उत्साह वाढणे
  5. शरीर पिळदार होणे
  6. रोग प्रतिकार क्षमता वाढते
  7. स्नायू मजबूत होतात
Similar questions