India Languages, asked by Ggyhhjjnvfgbnh247, 6 months ago

Essay on जुन्या घड्याळाचे आत्मवृत्त in marathi

Answers

Answered by borhaderamchandra
2

Explanation:

जुन्या घड्याळाचे आत्मवृत्त :

सुट्टीतले माझे आवडते काम म्हणजे माझ्या घराची सफाई. तेव्हा माळावरची निरुपयोगी सामान्य खाली काढले. त्याचे घड्याळ होते घड्याळ बंद होते; कोणते रंग रूप मला आवडले; म्हणून मी त्याला साफ केले, तसे ते बोलू लागले

" अरे मला, तुझ्या आजोबांनी मला या घरात आणले, तेव्हा माझे केवढे कौतुक झाले होते ! माझे सर्व अवयव हे परदेशात म्हणजे स्विझरलँड मध्ये तयार झाली होती. ' फोवर- लुबा ' या माझ्या जन्मदात्री कंपनीचं नाव माझ्यावर कोरले गेले.

तुझे आजोबा खरे रसिक. त्यांना चांगल्या वस्तू आणायची आवड होती. या घराच्या दिवाणखान्यात मी रुबाबात सोबत होतो. दर तासाला मी ठोके देत असे आणि त्या तालावर सर्वांचे काम चाली. तुझे आजोबा दर आठवड्याला मला न विसरता चावी देत. ते माझी काळजी घेत. त्यांना माझ्याविषयी अभिमान होता. घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना ते मला दाखवत.

" पुढे तुझे आजोबा वृद्धत्व आणि देवाघरी गेली. त्यावेळी मला खूप वाईट वाटले. आजोबा गेल्यावर सर्वांचे दुर्लक्ष झाले. बरीच वर्षे सेवा केल्यावर मी सुद्धा थकलो, गात्रे थांबली. वारंवार तक्रारी करूनही मी व्यवस्थित काम करू शकेन ना, तेव्हा माझ्या अडगळीच्या जागी रवानगी झाली.

" आता तू असे कर. मला एखाद्या जुन्या वस्तूंच्या संग्रहालयात देऊन टाक व नवीन इलेक्ट्रॉनिक चे घड्याळ घेऊन ये. मी तृप्त आहे" आवाज बंद झाला घड्याळ बोलायचे थांबले होते

Similar questions