essay on झाड माझा मित्र
Answers
Answer:
राजू नावाचा एक गरीब मुलगा होता. त्याची आई शेतमजुरी करायची, तेथे बाजूलाच मोठे डेरेदार झाड होते. त्या झाडाखाली राजू आपल्या सवंगड्यांसह खेळायचा. झाडाच्या पानांची टोपी करून गंमत करायचा, कधी थंडगार सावलीत झोपी जायचा. असे नेहमीच होई. त्यामुळे राजूला झाडाचा लळा लागला. झाडाशी राजूचे मित्रत्वाचे नाते निर्माण झाले.
राजू सहा वर्षांचा झाल्यावर आईने त्याला शाळेत घातले. त्यामुळे झाडाकडे जाण्याचे प्रमाण कमी झाले. एका रविवारी राजू झाडाकडे गेला, तेव्हा झाडाला खूप आनंद झाला झाड म्हणाले, 'अरे ए राजू, कुठे गेला होता? मी तुझी वाट पाहत होतो.' राजू म्हणाला, 'मी आता शाळेत जातो, अभ्यास करतो. आपण आता सुटीच्या दिवशी भेटत जाऊ.' अशाप्रकारे राजू झाडाला भेटायचा, गप्पा मारायचा. एक दिवस राजू काहीसा नाराज होऊन झाडाखाली बसला. झाड म्हणाले, 'काय झाले मित्रा बोलत नाहीस?' राजू म्हणाला, 'आई आजारी आहे, ती म्हणाली काही काम करून पैसे आण. आपल्याला खायला काही नाही, मी आता काय करू? कुठून आणू पैसे?' झाड म्हणाले, 'राजू, चिंता करू नको, हे बघ माझ्या अंगावर किती फळे आहेत; ती तोडून बाजारात विक.' राजू सरसर झाडावर चढला फळे काढून बाजारात विकली पैशातून आईला औषधे व खायला घेऊन आला. राजूला झाडाबद्दल खूप प्रेम वाटू लागले. राजू आता मोठा झाला होता. त्याचे लग्न झाले. पण, घर नव्हते. पुन्हा राजू झाडाकडे गेला आणि म्हणाला, 'मित्रा, मला घर नाही काय करू?' झाड म्हणाले, 'या माझ्या फांद्या काढ, त्यांची छानशी झोपडी बनव.' राजूने फांद्या काढून घर बांधले व सुखाने संसार करू लागला.