essay on "माझा आवडता सण" in Marathi( 1⃣0⃣0⃣-1⃣5⃣0⃣words)
Answers
गणपती म्हटलं कि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, किती दिवस सुट्टी आहे. शालेय विद्यार्थ्यासाठी गणपतीची सुट्टी म्हणजे पर्वणीच असते. पाऊस नुकताच संपलेला असतो, वातावरण अगदी प्रसन्न, हिरवेगार आणि आल्हाददायक असते. अश्या वातावरणात गणपती बाप्पांच्या आगमनाने सारे वातावरण बहरून येते. प्रत्येक जण आपल्या समस्या, भांडणे विसरून जातात. कळत नकळत सर्वांच्या चेहऱ्यावर एक तेज येत. किती बर होईल जर गणपती बाप्पा वर्षभर राहिले तर, सर्व किती मस्त असेल. गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी घरोघरी, सार्वजनिक मंडळांमध्ये मंडप, मखर, पताका बनवण्याची तैयारी सुरु होते. घरातील लहानगी, मोठी अगदी उत्साहाने तयारीला लागतात. या वर्षी कसल्या प्रकारची सजावट करायची, कैलाश पर्वत, गड की आणखी वेगळं काही, ही चर्चा खूप मजेशीर असते. कोणी म्हणत पूर्ण मखर घरी बनवू, कोणी म्हणत बाजारातून विकत आणू. ही हुज्जत ही खूप छान असते. गणेशाच्या आगमनापूर्वी एक दोन दिवस सगळे घर, अंगण साफ करायला घेतात, घरातील सगळे अगदी उत्साहात यात भाग घेतात. कितीही दिवस अगोदर तयारी केली तरीही जी मजा शेवटच्या रात्री येते ती वेगळीच असते. मखर बनवणे, पताका चिकटवणे, दिवे, पणत्या, समई शोधून स्वच्छ करून ठेवणे, या सर्व धावपळीत ही खूप मजा येते.
Read more at: https://teenatheart.com/mr/maja-maza-avadata-san-my-favorite-festival-essay-marathi/
Answer:
Explanation:माझा आवडता सण दिवाळी आहे.
दिवाळी हा सण भारतामधील एक लोकप्रिय सण आहे.
दिवाळी हा सण दिव्यांचा आहे.दिव्यांच्या उजेडाने अंधाराला दूर करण्याचा सण म्हणजेच दिवाळी.दिवाळीत लोक आपआपल्या घरासमोर दिवे पेटवतात,कंदील लावतात,रांगोळी काढतात,फुलांनी घराची सजावट करतात.
दिवाळीच्या अगोदर लोकांची नवीन वस्तू,कपड्यांची खरेदी करण्याची सुरुवात होते,घराची साफसफाई करणे, फराळ बनवायची सुरुवात होते.धनत्रयोदशी,नरकचतुर्दशी,लक्ष्मीपूजन,बळीप्रतिपदा, भाऊबीज हे दिवाळीचे पाच दिवस आहेत.प्रत्येक दिवसाचे आपले वेगळे महत्व असते.
लोकांना दिवाळीत ऑफिस,शाळा,कॉIलेजला सुट्टी असते.लोक फटाके फोडून,एकमेकांच्या घरी जाऊन,त्यांना भेटून, एकमेकांना भेटवस्तू,शुभेच्छा,फराळ,मिठाई देऊन आनंदात हा सण साजरा करतात.हा सण उत्साहाचा व आनंदाचा असतो.दिवाळीत सर्वत्र आनंदमय वातावरण असते.
असा हा आनंदाचा सण माझा आवडता आहे.