essay on maaze awadte paryatan sthal in marathi
Answers
■■ माझे आवडते पर्यटन स्थळ■■
माझे सगळ्यात आवडते पर्यटन स्थळ महाबळेश्वर हे आहे.महाबळेश्वर हिलस्टेशन एक लोकप्रिय पर्यटक स्थळ आहे.
महाबळेश्वर मध्ये फिरण्यासरखे खूप ठिकाण आहेत.इथे अगदी निसर्गमय वातावरण असते. येथील थंड वातावरणामुळे वर्षाच्या कोणत्याही वेळी इथे जाता येते.महाबळेश्वर तिथे वाढणाऱ्या स्ट्रॉबेरीसाठी खूप प्रसिद्ध आहे.
मी इथे ३-४ वेळा गेली आहे.इथल्या वेना लेक, प्रतापगड किल्ला,लिंगमाळा धबधबा, टेबल लैंड,आर्थर सीट,विल्सन पॉइंट,सनसेट पॉइंट या ठिकाणांना मी भेट दिली आहे.
तसेच इथल्या प्रसिद्ध मॅप्रो गार्डन मध्ये खूप मजा येते.तिथे विविध ज्यूस,जैम,चॉकलेट,जेली,सैंडविच, बर्गर मिळतात.इथला स्थानिक बाजार खूप प्रसिद्ध आहे.तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, चप्पल,कपडे,पाहायला मिळतात.इथे गेल्यावर मी इकडचा लोकप्रिय स्ट्रॉबेरी आइसक्रीम नेहमी खाते.
मुंबईपासून जवळ असल्यामुळे आणि तिथल्या निसर्गमय वातावरणामुळे महाबळेश्वर माझे आवडते पर्यटन स्थळ आहे.