India Languages, asked by yashvardhan3033, 1 year ago

Essay on majhe ajoba in marathi language sort essay

Answers

Answered by rudirana08
161

Answer:

माझे आजोबा

         माझे आजोबा म्हणजे सदैव प्रसन्न अशी मूर्ती;ते नेहमी आनंदी असतात.कधी कुरकुर नाही की कधी चिडचिड नाही.मी तरी त्यांना अजूनपर्यंत कधी चिडचिड करताना  पाहिलेले नाही.ते सदोदित हास्य विनोद करत वावरतात.यामुळे सगळ्यांना त्यांचा सहवास आवडतो.त्यांच्या  स्नेहयांचा मोठा गोतावळा आहे.आमच्या सर्व नातेवाईकांनाही आजोबा खूप आवडतात.आजोबा सर्वांची नेहमी अगत्याने चौकशी करतात.सळ्यांशी त्यांचे चांगले सबंध आहेत.त्यामुळे आमच्याकडे पाहुण्यांची व मित्रमंडळाची सतत वर्दळ असते.आजोबा दिसेल कि सळ्यांना आनंद होतो.

       माझ्या आजोबांना नीटनेटकेपणा व स्वच्छता यांची भारी आवड आहे.हा गुण तर सगळयांनी त्यांच्याकडून घ्यावा असा आहे.त्यांच्या दिवसाची सुरुवातच मुळी नीटनेटकेपणाने होते.प्रथम खिडक्या,कवडे,खुर्च्या-टेबले,कपाट यांच्यावरची धूळ ते पुसून काढतात.सुमारे अर्धा तास त्यांची ही साफसफाई चालते.मग ते त्यांनी लावलेल्या रोपट्यांकडे वळतात.इथेही त्यांच्या स्वभावातील नीटनेटकेपणा व प्रेमळपणा दिसून येतो.प्रथम ते मऊ व ओलसर फडक्याने रोपटयाची पाने हळूवारपणे पुसून घेताना;ओल्या फडक्याने कुंडी पुसून घेतात आणि मग रोपट्यांना पाणी घालतात.आजोबाच्या प्रेमळ स्पर्शाने जणू रोपटी टवटवीत बनतात.

Answered by dhananjayzaddz
83

साफसफाई झाली कि ,ते आंघोळ करतात ;न्याहरी घेतात आणि सकाळचा फेरफटका मारायला बाहेर पडतात.तासाभराने परत आले कि,पुन्हा एकदा चहा घेतल्यावर त्यांच्या आवडीच्या दिनक्रमाला सुरुवात करतात.तो म्हणजे वाचनाचा.ते तासभर तरी वर्तमानपत्रे वाचतात.त्यांना वर्तमानपत्रे वाचयला खूप आवडतात.म्हणून आम्ही तीन वर्तमानपत्रे घेतो.एक इंग्रजी आणि दोन मराठी.ते वाचत असताना आजूबाजूला कोणी असले,तर त्यांना ते वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या बातम्या ऐकवतात.इंग्रजी वर्तमानपत्र वाचताना ते न चुकता शब्दकोश घेऊन बसतात.एखादा शब्द अडला,तर कंटाळा न करता शब्दकोशात शब्द शोधतात.मी बाजूला असली.तरी त्यांना मदत हवी असल्याचा आव आणून मला शब्द शोधायला लावतात.त्यांच्या या सवयीचा मला इतका फायदा झाला आहे कि,वर्गात माझा इंग्रजी निबंध सगळयांपेक्षा चांगला असतो.

संध्याकाळी फेरफटका आटोपल्यावर ते माझ्याशी गप्पा मारायला बसतात.माझी दिवसभराची हकीकत विचारून घेतात.शाळेत कोणकोणत्या विषयांचे तास झाले,कोणी काही प्रश्न विचारले का, शिकवलेल्या भागातील काय जास्त आवडले,काय कठीण वाटले असे सर्व काही विचारून घेतात.आता माझ्या लक्षात येते की,त्यांच्या या सवयीमुळे त्या त्या दिवशी शिकवलेल्या अभ्यासाची नकळत उजळणी होऊन गेली आहे.मी अभ्यासाला बसले कि,त्यांचे माझ्याकडे बारीक लक्ष असते.मी कशी अभ्यास करते,माझं लक्ष पुस्तकात आहे का ?आणि ते मला पाठांतर करताना खूप मदत करतात,ते दररोज,अगदी आत्ता मी D.EL.ED असताना सुद्धा पुस्तकमधील मजकूर मोठ्याने वाचायला लावतात.

मनात चांगले विचार बाळगावेत,त्यानुसार चांगले वागावे आणि हे सर्व नियमितपणे करावे,असे त्यांचे सर्वाना सांगणे असते.बोले तैसा चाले,त्याची वंदावी पाउले;असे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे.ज्यांची पाउले वंदावीत असेच माझे आजोबा आहेत.

plz

mark me brainlist

Similar questions