Hindi, asked by Sahilpanjla6617, 1 year ago

Essay on majhi aavadti jaga

Answers

Answered by AdityaRocks1
6
कर्नाटक राज्य म्हणजे देवळांचे, गोपुरांचे राज्य असे म्हटले जाते. म्हैसूर किंवा मैसूर म्हटले की आपल्याला प्रथम आठवते सँडल अगरबत्ती आणि म्हैसूर डोसा. मैसूरमध्ये या दोन वस्तू प्रसिद्ध आहेतच; पण एकदा या शहराला भेट दिली की, अन्य अनेक गोष्टीही आपले लक्ष वेधून घेण्यास समर्थ असल्याचे जाणवते. या शहरातील सर्व रस्ते राजवाड्याकडे किंवा पॅलेसकडे जातात असे सांगितले जाते. मैसूर हे पर्यटकांचेही आवडते स्थळ आहे.

मैसूरचा राजवाडा हे या शहरातले मोठे प्रस्थच म्हणायला हवे. आकाराने प्रचंड असलेला हा राजवाडा आजही अत्यंत उत्तम स्थितीत जतन केला गेला आहे. दूरवरूनच दिसणारे राजवाड्याचे घुमट, प्रचंड मोठी भिंत राजवाड्याकडे आपल्याला खेचून घेतात असे म्हटले तर खोटे ठरू नये. राजवाड्यात आत जाण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. कोरीव कामाने नटलेले खांब, छते, दरवाजे आणि जगभरातून गोळा केलेल्या कलात्मक वस्तूंचे संग्रह अक्षरश: डोळे दिपविणारा. सुरुवातील हा राजवाडा पूर्ण लाकडातच बांधला होता. मात्र, तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे हा नवा राजवाडा १९११-१२ सालात पुन्हा बांधण्यात आला. इंग्लीश आर्किटेक्ट हेन्सी आयर्विन याने त्यासाठीचा आराखडा तयार केला होता. ही वास्तूरचना हिंदू आणि मुघल शैलीचे मिश्रण असून घुमट, कमानी, प्रशस्त व्हरांडे ही याची वैशिष्ट्ये.

राजे वडियार यांचा हा राजवाडा. त्यांचा अंबा पॅलेस आवर्जून पहावा असा. येथे आहे डॉल पॅव्हेलियन, युरोपियन -इंडियन शिल्पे, सेरेमोनियल वस्तू. दरबार हॉलमधील कोरीव खांब अप्रतिमच. वडियारांसाठी अतिशय अभिमानाची असलेली ही वास्तू म्हणजे रॉयल गोल्डन थॉर्न. त्यांच्या सार्वभौमत्वाचे हे प्रतीक. दसर्‍याचा उत्सव हा येथील मोठा उत्सव. त्या दिवशी राजाची आजही मिरवणूक काढली जाते. हा महाल तेव्हा पाहण्यासाठी खुला असतो. विवाह पॅव्हेलियनमध्ये आहेत पेंटींग्ज, टाईल फ्लोअरिंग, कास्ट आयर्नचे खांब, झुंबरे आणि स्टेन ग्लास वर्क. याच परिसरात अनेक देवळे आणि समाध्याही आहेत. रविवारी अथवा सुटीच्या दिवशी हा राजवाडा रोषणाईने नुसता झळकत असतो.

म्हैसूरपासून केवळ १३ किमीवर असलेली चामुंडा हिल हे ३४९९ फूट उंचीवरचे स्थान म्हणजे महत्त्वाचा लँडमार्कच आहे. येथून दिसतात शहरातील सरोवरे, पॅलेस आणि बागांचे नजारे. चामुंडा ही वडियार कुटुंबाची देवी. महिषासूराचा वध करणारी. या टेकडीवरच तिने हा वध केला असे मानले जाते. महिषासूराच्या जाचातून प्रजेची सुटका करणारी ही देवी पार्वतीचे रूप आहे. १२ व्या शतकात येथे चामुंडेश्वरीचे मंदिर आणि भव्य गोपूर उभारले गेले. १ हजार पायर्‍या चढून गेल्यावर प्रथम दिसते ती महिषासूराची अतिप्रचंड मूर्ती. त्याच्यापुढे आहे १६ फूट उंचीचा नंदी.

अन्य प्रेक्षणीय आणि आवर्जून पाहायलाच हवीत अशा स्थळांतली मुख्य आहे वृंदावन गार्डन. मुघल स्टाईलने बांधलेली ही बाग कावेरीवर असलेल्या कृष्णराजसागर धरणाच्या पाण्यावर जतन केली जाते. सूर्यास्त होताच विविध रंगी लाईटच्या तालावर नाचणारी कारंजी हे येथले मुख्य आकर्षण. रेल्वे म्युझियमही पाहण्यासारखे. म्हैसूरला खरेदी करायला अनेक चॉईस आहेत. चंदनाच्या वस्तूंनी बाजार घमघमत असतोच पण कोरीव कामाच्या हस्तीदंती वस्तू नुसता हात लागला तर फुटतील काय इतक्या नाजूक दिसतात. टिकायला मात्र चांगल्याच दणकट असतात. रोझ वुडच्या वस्तू आणि फर्निचर नितांत सुंदर असे. मग चंदन तेल, अगरबस्ती, खेळणी, ब्राईट रंगातील पेंटिंग्ज आणि सिल्क साड्या तुम्हाला आकर्षून घ्यायला समर्थ आहेतच.
Similar questions