India Languages, asked by fayazahmad5867, 1 year ago

Essay on Mala pankh aste tar in Marathi.
मराठी निबंध मला पखं असते तर

Answers

Answered by ruchikabastta84
453

सकाळी बाहेरगावी असलेल्या मामेभावाचा फोन आला होता. तो सांगत होता त्यांच्या गावात चालु असलेल्या जत्रे विषयी आणि म्हणत होता तु पण ये ना इकडे खुप मज्जा येईल. त्यावेळेस मी बोलुन गेलो “मला काय पंख आहेत का? कधीही उठाव आणि उडत उडत कुठेही पोहोचावं!”

त्याचा फोन ठेवला आणि मना मध्ये विचारचक्र सुरु झाले, खरंच मला पंख असते तर?

सगळ्यांत पहिल्यांदा म्हणजे कुठेही जाण्यासाठी जे आई-बाबांवर अवलंबुन रहावे लागते ते नाहीसे होईल. क्धीहि, कुठेही जावेसे वाटले तरी ते सहज शक्य आहे नाही का? पंख पसरले, आकाशी भरारी घेतली आणि झालो हवेच्या लाटेवर स्वार. रस्त्यावरील वाहतुकीचा, गर्दीचा त्रास नाही, वाहनाची किंवा वाहनचालवण्याच्या परवान्याची आवश्यकता नाही की अपघाताची भीती नाही.

रस्त्यावरील घाण, कचरा, दुर्गंधी, खड्डे हे सगळे पादचाऱ्यांसाठी, हवेत उडणाऱ्याला त्याची काय पर्वा? अवकाशातुन ही धरणी सुंदर, हिरवीगारच भासते. जमीनीवर भासणाऱ्या उत्तंग इमारती आकाशातुन किती छोट्या वाटतील? कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर. ना राज्यांची बंधन ना देश्याच्या सिमा. मनात आलं तर कधी एका देशात तर कधी दुसऱ्या. कित्ती मज्जा!! शब्दशः सांगायचे झाले तर “वसुधैव कुटुंबकम”, हे विश्वची माझे घर.

Answered by Haezel
509

मराठी निबंध मला पखं असते तर :

मला पंख असते तर मराठीत एक गाणं आहे ‘आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिजरा’ ही ओळ खरी झाली असती. . मला पंख असते तर मी पक्षी असतो. पंखामुळे आकाशात छान स्वछंद उडता आले असते. रोज सकाळी उठले की एक आकाशात उंच गिरकी घेयची आणि फिरत राहायचे. आकाशातुन सगळी धरती कशी सुंदर दिसेल. पंखामुळे मला हवे तिथे, हवे तेव्हा, लवकरात लवकर जाता येईल. पक्षांप्रमाणे मोकळा श्वास घेता येईल. पृथ्वी वरील सृष्टी सौदर्य पाहिल. रस्त्यावरची गर्दी नाही, कचरा, घाण नको यांचा त्रास. मला पखं असते तर ही कल्पना किती सुंदर आहे. पण नंतर विचार केला की पक्षांना पण काही अडचणी येत असतील तेव्हड्यात एक पक्षी विजेच्या तारेला धडकून मरण पावला ते पाहिल्या वर असे वाट्ले की बरेच झाले मला पंख नाही ते. मानवाला पंख असते तर त्यात आणि पक्षांमध्ये फरक काय उरला असता.  

Similar questions