India Languages, asked by HetviNandu, 8 months ago

essay on maza avadata sant​

Answers

Answered by pom20943
6

Explanation:

I hope it is helpful for you

Attachments:
Answered by siddhisalgaregradevi
4

Explanation:

माझे आवडते संत: ज्ञानेश्वर निबंध (maze avadte sant in marathi)

भारतभूमी ही महान संताची भूमी आहे. संतांनी आपल्या शिकवणीतून समाजाला वेगळी दिशा दिली आहे. महाराष्ट्रात संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास इत्यादी. संत होऊन गेले आहेत. सर्व संताची शिकवण सारखीच असते. पण माझ्या पसंतीचे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. संत ज्ञानेश्वर यांनी अतिशय कमी वयात ज्ञानाची प्राप्ती करून समाजाला नवीन दिशा दिली होती. ते महाराष्ट्रातील महान संत व कवी होते.

संत ज्ञानेश्वरांचा जन्म महाराष्ट्र मधील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळ असलेल्या आपेगाव या गावात इसवी सन 1275 मध्ये झाला. त्याच्या आई वडिलांना 4 अपत्य होती. ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी सन्यास मधून परत गृहस्थाश्रम मध्ये प्रवेश केला, या मुळे समाजाने त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकले होते. समाजाच्या या हेटाळणीला कंटाळून शेवटी ज्ञानेश्वरांच्या वडील व आईनी आत्महत्या करून प्रायश्चित केले.

आई वडिलांच्या मृत्यूमुळे संत ज्ञानेश्वर व त्याची भावंडे अनाथ झाली. या नंतर ते चारही जन पैठण ला जाऊन पोहोचले. 15 वर्षाच्या कमी वयात ज्ञानेश्वरांनी भगवान कृष्णाच्या भक्तीत स्वताला तल्लीन करून दिले. संत ज्ञानेश्वरांना साक्षातकाराची प्राप्ती झाली. इसवी सन 1290 मध्ये त्यांनी दैवी ज्ञान असलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरांचा दुसरा ग्रंथ 'अमृतानुभव' हा होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा व जीव ब्रह्म एक्याचा ग्रंथ आहे. यात 800 ओव्याचा समावेश आहे. चांगदेव पासष्टी या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेव महाराजांचे गर्वहरण करून त्यांना योग्य उपदेश देखील दिला.

ज्ञानेश्वर अतिशय कमी वयात सिद्धी प्राप्त करणारे संत होते. ‘जो जे वांछील, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्‍न चंद्रभागेच्या वाळवंटात केला.

20 वर्षाच्या कमी वयात त्यांनी आपले जीवन कार्य संपवले व इसवी सन 1296 मध्ये त्यांनी समाधी धारण केली. त्याच्या समाधीच्या अवघ्या वर्षभरात त्यांच्या भावंडांनी पण आपले शरीर त्यागले.

Similar questions