India Languages, asked by prasadshah, 1 year ago

essay on mazi aai in marathi
upto 250 words not repeated one something new

Answers

Answered by tejasmba
5

माझी आई

स्वामी विवेकानंदांचे हे वाक्य "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी" हे अगदीच खरं आहे. आपल्याजवळ खूप धनसंपत्ती आहे, पण जर प्रेमाने, मायेने डोक्यावर हाथ फिरवणारी आई नाही तर मग आपले जीवन व्यर्थच आहे. जेव्हा एक छोट बाळ बोलायला शिकतो तेव्हा पहिले शब्द शिकतो ते आई.

मा‍झ्या आईबद्दल मी काय सांगू. मा‍झ्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे ती. सर्वगुणसंपन्न, सूंदर आहे माझी आई. प्रत्येक क्षणी, जीवनातील प्रत्येक कठीण वाटेवर मा‍झ्या सोबत उभी एका मैत्रीणी सारख उभी राहते ती माझी आई. लहानपणा पासून आज पर्यंत मी तिला बघतो आहे. पहाटे सर्वप्रथम ती उठते, मला उठवते, शाळेकरता तयार करते, माझा नाश्ता बनवते, माझी बैग पैक करण्यास मदत करते। माझा डब्बा सुद्धा मी शाळेत निघायच्या आत तयारच असतो.

ही तिची रोजचीच दिनचर्या आहे। सकाळी लवकर उठणे, मला शाळेत व बाबांना ऑफिसामध्ये पाठवणे, घरकाम करणे, आजीच्या पूजेची तैयारी करण, संध्याकाळी माझा अभ्यास घेणे व माहिती नाही आणखी किती काम ती करते ते. आणि एवढं केल्यानंतर ही कधीच तिच्या चेहरयावर तो त्रास नाही दिसत कि कधी कंटाळा नाही दिसत. चुकीच्या गोष्टीवर खूप रागवणारी तर तेच परीक्षेत चांगले नंबर मिळाल्यावर शाबाशी देते ती माझी आई.

 

एकदा तर मला खूप ताप आला असताना ती रात्रभर मा‍झ्या शेजारी बसून पाण्याची पट्टी मा‍झ्या माथ्यावर ठेवत बसली होती। सदा न कदा मा‍झ्या आवड़ी -निवड़ीची काळजी घेत असते माझी आई. घरात प्रत्येकाच्या आवडी निवडी जपत असते ती.

मला जे चांगले संस्कार लाभले आहेत ते तुझीच देणगी आहे. मला खूप अभिमान वाटतो कि मला इतकी चांगली आई  भेटली. मी कितीही आईबद्दल लिहिले तरी ते कमीच वाटणार.. पण आईला नेहमी आनंदात ठेवणं व माझ्याकरिता घेतलेल्या कष्टांच चीज करणं हेच मा‍झ्या जीवणाचं खरं उद्देश्य आणि लक्ष्य आहे।

Similar questions