essay on mazi sahal in marathi
Answers
Answer:
माझी सर्वात अविस्मरणीय सहल म्हणजे मी कॉलेजला तेरावीला असताना होती. तेव्हा आमच्या कॉलेजने महाबळेश्वरला सहलीचे आयोजन केले होते. ती तीन दिवसांची सहल होती.
माझे वडील मला सकाळी बसपर्यंत सोडायला आलेले. बसमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने आमचा प्रवास सुरू झाला.आम्ही प्रवासादरम्यान अंताक्षरी खेळत होतो. आमचे शिक्षकही आमच्यात सामील झाले. बस चालकाने काही चांगली गाणी वाजवली, ज्यावर आम्ही वेडसर लोकांसारखे नाचत होतो. बस मधल्या 'विंडो सीट' मधून सुंदर आकाश,उंच पर्वत,ते निसर्गमय वातावरण पाहण्याची मज्जाच निराळी होती.महाबळेश्वरला पोहोचल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो व तिथे आराम केला. दुसर्या दिवशी आम्ही मॅप्रो गार्डन, लिंगमाळा धबधबा, टेबल लैंड,सनसेट पॉइंट,वेना लेक,आर्थर सीट, एल्फिन्स्टन पॉइंट, प्रतापगड किल्ला या ठिकाणांना भेट दिली.महाबळेश्वर लोकल मार्केटमध्ये बरीच खरेदी केली. आमच्या परतीच्या प्रवासादरम्यान आम्ही वाई गणपती मंदिर, प्रति शिर्डीलाही भेट दिली.
ते तीन दिवस इतक्या लवकर कसे संपले,काय कळलेच नाही. त्या सहलीला अनेक वर्षे झाली पण त्या आठवणी माझ्या मनात अजूनही ताज्या आहेत.
Explanation: