India Languages, asked by maheshborse750, 6 months ago

Essay on me pahelela apghat of one page

Answers

Answered by har858
1

Explanation:

मी पाहिलेला अपघात रोजच्याप्रमाणे सकाळी शाळेत जाण्यासाठी मी बाहेर पडलो होतो. माझ्याबरोबर माझा एक वर्गमित्र होता. रस्त्यावर नेहमीचीच वर्दळ होती. मित्राबरोबर मी गप्पा मारत चाललो असताना 'कर्रऽऽ' असा आवाज आमच्या कानी आला. बसचे ब्रेक लावल्याचा तो विलक्षण कर्कश आवाज होता. त्या राक्षसी आवाजाने माझ्या अंगाचा थरकाप उडाला.

मी चमकून समोर पाहिले तो एक दुमजली बस थडथडत उभी होती. रस्त्यावरचे लोक बसच्या दिशेने पळत होते. पाहता पाहता बघ्यांची अलोट गर्दी तेथे लोटली. बसमधील उतारू डोकावून बघत होते. मोठा अपघात झाला असणार अशी शंका माझ्या मनात आली. म्हणून मी त्या गर्दीत थोडे पुढे शिरण्याचा प्रयत्न केला.लोकांच्या बोलण्यावरून मला समजले की, दोन छोट्या मुली बसखाली आल्या होत्या. मला आठवले की, दररोज या वेळी दोन छोट्या मुली आपल्या नर्सरी शाळेत जाण्यासाठी शाळेच्या बसची वाट पाहत उभ्या असत. त्यांचे ते हसरे, बोलके, निरागस चेहरे माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेले.

आज शाळेच्या बसच्या आधी आलेली ही बस त्यांचा घात करून बसली होती. गर्दी वाढत होती. त्या मुलींचे पालक ओक्साबोक्शी रडत होते. पोलीस गर्दी हटवण्याची पराकाष्ठा करत होते. शाळेला उशीर होईल म्हणून मी तेथून जड पावलांनी पुढे गेलो; पण ते दृश्य काही केल्या माझ्या डोळ्यांपुढून हलत नव्हते.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व अपघात कमी करण्‍यासाठी काय उपाय केले पाहीजे याविषयी हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद .

Answered by MonikaJagat
0

Answer:

Hope It Helps

Explanation:

मी पाहिलेला अपघात रोजच्याप्रमाणे सकाळी शाळेत जाण्यासाठी मी बाहेर पडलो होतो. माझ्याबरोबर माझा एक वर्गमित्र होता. रस्त्यावर नेहमीचीच वर्दळ होती. मित्राबरोबर मी गप्पा मारत चाललो असताना 'कर्रऽऽ' असा आवाज आमच्या कानी आला. बसचे ब्रेक लावल्याचा तो विलक्षण कर्कश आवाज होता. त्या राक्षसी आवाजाने माझ्या अंगाचा थरकाप उडाला.

मी चमकून समोर पाहिले तो एक दुमजली बस थडथडत उभी होती. रस्त्यावरचे लोक बसच्या दिशेने पळत होते. पाहता पाहता बघ्यांची अलोट गर्दी तेथे लोटली. बसमधील उतारू डोकावून बघत होते. मोठा अपघात झाला असणार अशी शंका माझ्या मनात आली. म्हणून मी त्या गर्दीत थोडे पुढे शिरण्याचा प्रयत्न केला.

लोकांच्या बोलण्यावरून मला समजले की, दोन छोट्या मुली बसखाली आल्या होत्या. मला आठवले की, दररोज या वेळी दोन छोट्या मुली आपल्या नर्सरी शाळेत जाण्यासाठी शाळेच्या बसची वाट पाहत उभ्या असत. त्यांचे ते हसरे, बोलके, निरागस चेहरे माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेले.

आज शाळेच्या बसच्या आधी आलेली ही बस त्यांचा घात करून बसली होती. गर्दी वाढत होती. त्या मुलींचे पालक ओक्साबोक्शी रडत होते. पोलीस गर्दी हटवण्याची पराकाष्ठा करत होते. शाळेला उशीर होईल म्हणून मी तेथून जड पावलांनी पुढे गेलो; पण ते दृश्य काही केल्या माझ्या डोळ्यांपुढून हलत नव्हते.

Similar questions