Music, asked by ayesha250, 1 year ago

essay on me pradhanmantri zalo tar​

Answers

Answered by strishanthreddy
7

Answer:

रोज वर्तमानपत्र वाचल्यावर कींवा दूरचित्रवाणीवरील बातम्या एकल्यावर अनेकदा संताप येतो, मन उद्विग्न होते. मनात येतं, काय चायलंय आपल्या देशात ? आता आपला देश स्वतंत्र होऊन जवळजवळ एक्काहत्तर वर्षे होत अली, तरी तरी आजही आपल्या स्वराज्याचं सुराज्य का होऊ शकलं नाही. खरकाच मी पंतप्रधान झालो तर या भारतात सुराज्य निर्माण करण्याचा मी प्रयत्न करीन.  

     जगातील एक मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपला भारत देश ओळखला जातो. पण खरंच आपल्या देशात लोकशाही आहे का ? लोकशाही यशस्वी अन्यसाठी देशातील नागरिक सुशिक्षितीत हवेत, सुजाण हवेत. त्यांना देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीतील आपल्या एका मताचं महत्त्व कळायला हवं आणि त तेव्हाच कळेल, जेव्हा सगळे लोक सुशिक्षित होतील.मी पंतप्रधान झालेतर देशात शंभर टक्के साक्षरता आणण्याचा प्रयत्न करीन या उपक्रमाला अग्रस्थान देईन.

     मला खात्री आहे कि, आपण आपल्या देशातून निरक्षरता हद्दपार केली, तर आपल्या देशातील बऱ्याच समस्यांवर मत करता येईल. आजही आपल्या समाजात अंधश्राद्धा फार मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे.श्रद्धेच्या नावाखाली  अनेक भयानक गोष्टी घडत असतात यात्रेच्या ढिकानी तयार श्रद्धेचा बाजार मांडला जातो आणि   कित्येक वेळेला चेंगराचेंगरीत शेकडो जीवांचं मरण ओढवत. मूठभर लोकांकडून अनेक अन्याय केला जातो. पिळवणूक केली जाते. गरिबांना धनिकाकडून पिळलं जातं बालमजुरांची समस्या आजही मोठ्या प्रमाणात आढळते. मी पंतप्रधान झालो तर प्रथम या सर्वच समस्यांच्या मुळाशी जैन अमी त्या हद्दपार करण्यासाठी झटेन

     आपल्या देशाला आज ग्रासणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे 'भ्रस्टाचार'. भारताच्या सर्वांगीण विकासातील हा भ्रस्टाचार फार मोठा अडथडा आहे. हा भ्रस्टाचार मुळापासून उपटून टाकण्यासाठीच मला पंतप्रधान व्हायचे आहे.

      माझ्या मनात माझ्या समृद्ध भारतमातेचे एक मनोरम चित्र आहे माझीही मातृभू एक काली सुवर्णभूमी होती, साऱ्या जगत ती ज्ञानाचं केंद्र होती, असे उल्लेख प्राचीन काळातील प्रवाश्यांची लिहून ठवलेले आहेत. ते वैभव मी माझ्या या प्रिय भारतभूल पुन्हा प्राप्त करून देईन.त्या साठी एक दिवस तरी पंतप्रधान झालो पाहिजे !

Explanation:

Similar questions