India Languages, asked by sanu431, 1 year ago

essay on mehengai in marathi

Answers

Answered by vaibhav176
13
महागाई म्हटले की ज्या व्यक्तीच्या डोक्यावर आठ्या पडत नाही, त्या व्यक्तीच्या डोक्यावर आठ्या पडायला सुरुवात होते.

अतिपरिचयात अवज्ञा ! एखादी गोष्टा चिरपरिचित झाली की तिचे महत्त्व वाटेनासे होते. सध्याच्या महागाईविषयी असेच झाले आहे. महागाईचा भस्मासूर सामान्य माणसाला खूप त्रासदायक झालेला आहे. महागाई वाढली की व्यक्तीच्या जीवनात फार मोठ्या प्रमाणात बदल दिसून येतात. यामुळे व्यक्तीला महागाई वाढल्यामुळे आपली हौस पूर्ण करता येत नाही.

सध्याची महागाई बघून आपले आजी-आजोबांनी काही गोष्टी सांगितल्या की आपल्याला त्या केवळ दंतकथाच वाटतात काय तर म्हणे, पूर्वी रुपायाला पाच शेर तांदूळ मिळत होते. लोणी, तूप, दूध यांची रेलचेल होती. सोने वीस रुपये तोळा होते. महिना पंधरा-वीस रुपयांच्या पगारात आठ-दहा माणसांचे कुटुंब राहून वर पाच-सहा रुपये शिल्लक टाकता येत असत.

सध्याच्या काळात रोज लहान मुलांना दिवसभरातील दहा रुपये खर्च काहीच वाटत नाही. या सर्व गोष्टी आज परिकथेप्रमाणे अद्भूत आणि असंभवनीय वाटतात. आज पैशाचे मूल्य घसरत चालले आहे. कितीही पैसे मिळवले तरी ते पुरत नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात पाहिलेली स्वप्ने आज भंग पावली आहेत. तेव्हा असे वाटत होते की, स्वराज्य आले की, आपण खूप सुखी होऊ. पण सध्याला प्रत्येकाच्या वाट्याला आलेले वास्तव अतिशय भयंकर आहे.

सध्याच्या महागाईमुळे काही गोरगरीब, मजूर एका वेळचे अन्न देखील खाऊ शकत नाही. महागाईचा आलेख सतत वरवरच चढत जात आहे. त्यामुळे कित्येक जीवनावश्यक गोष्टीही आज दैनंदीन जीवनातून भागत नाहीत.

खरे पाहता, स्वातंत्र्योत्तर काळात आपण कृषी आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रात प्रचंड प्रगती केली होती. परंतु सध्या शेतीची अवस्था, महापुरासारख्या विविध गोष्टींमुळे पिकांची नासाडी होते. यामुळे शेतातून योग्य असा माल मिळत नाही. यामुळे बाजारपेठेत माल कमी येतो. तसेच सरकारकडून मालाला योग्य भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळतात व या परिस्थितून महागाई वाढण्यास सहजरित्या अनेक विविध पर्याय उपलब्ध होतात.

हरितक्रांती, श्वेतक्रांती झाली असे उत्पादक म्हणतात. मग आजही गरीबांच्या मुलांना किमान एक वेळची भाकरी व दूध का मिळू नये ? याला जबाबदार कोण ? 

स्वातंत्र्योत्तर काळातील आर्थिक स्थितीचा अधिक अभ्यास केला तर लक्षात येते की, श्रीमंत हे अधिक श्रीमंत व गरीब हे अधिक गरीब होत आहेत.

दैनंदिन गरजेच्या गोष्टी महाग झाल्यावर त्याने काय करावे ? दूध हे पूर्वान्न पण आज तो जणू चैनीची गोष्ट झाली आहे, अन्नधान्य, तेल-तूप, डाळी तसेच भाजीपाला यावर महागाईचे आक्रमण झाल्यावर गरीबांना ते मिळाले केवळ अशक्य ठरते. आज निवासी जागांच्या किमती आकाशाला भिडल्याने झोपडपट्ट्या सतत वाढत आहेत.

महागाईमुळे कौटुंबिक सौख्य लाभत नाही तर तणाव वाढतो मुलांच्या लहानमोठ्या गरजादेखील पूर्ण करणे पालकांना अशक्य होते. वैयक्तिक व सामाजिक चारित्र्याचा ऱ्हास होतो.

अशी ही महागाईरुपी महामाया अनेक संकटांना आमंत्रण देते. आजच्या या प्रगत जगात अनेक गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. इंधन टंचाई हा महत्वाचा घटक हा महागाईला फारच पोषक ठरला. दळणवळण तर एवढे महाग झाले आहे की, गरीबांनी प्रवास करु नये. या साऱ्या गोष्टींच्या किमती वाढलेल्या आहेत. अशावेळी वाटते की, पूर्वीचे पंचक्रोशिपुरते मर्यादीत असलेले जीवनच बरे हो

Similar questions