India Languages, asked by TanmayGodfire, 9 months ago

Essay on Mera bharat desh mahan in marathi​

Answers

Answered by mkbxr98
2

Answer:

'मेरा भारत महान..' होय, मला आपल्या देशाचा अभिमान आहे. तसा तो प्रत्येकालाच असतो कदाचित. मी "कदचित' म्हणतेय कारण जो तो आपपल्या सोयीनुसार देशप्रेम, देशभक्ती हे शब्द वापरत असतो. म्हणजे काही चांगले घडले तर अभिमान आणि नाही तर मग हा आपला देश किती मागासलेला आहे, किती भ्रष्ट लोकांचा आहे वगैरे. अर्थात तेही वास्तव आहेत. माझा हा देश अन्य काही देशांपेक्षा मागासलेला आहे. गरीब आहे. देशाला भ्रष्टाचार, अंधश्रद्धा यांचा जणू महाशाप आहे. लोकसंख्या, बेरोजगारी, निरक्षरता यांचा फार मोठा विळखा भारताभोवती आहे. कदाचित समस्यांच्या यादीसाठी हे पानदेखील कमी पडेल. मग हे सगळं असताना "भारत महान' कसा असू शकतो...?

एक तर, निश्‍चित चढउतार तर असतातच. व्यक्तीच्या आयुष्यात असतात तसे देशाच्या संदर्भातही. आघात असतात. अडचणी असतात. आव्हानं असतात. कधी लादलेल्या परिस्थितीची. तर कधी बदलत्या परिस्थितीची. ती पेलायची तर वेळ हवा, कष्टाची तयारी हवी. इच्छाशक्तीही हवी. देश म्हणजे काही दगड-विटांनी, सिमेंटने सांधलेलं स्ट्रक्‍चर नव्हे..

इथे आठवते ती, देश जोडण्यासाठी त्या गोष्टीतल्या मुलानं वापरलेली ती युक्ती. "जीगसॉ पझल' तुकडे जोडून देशाचा नकाशा साकारण्याचा त्याचा प्रयत्न फसतो, तेव्हा तो त्या नकाशामागचा माणूस जोडतो. देश आपोआप जोडला जातो. या सगळ्याचा भारताच्या महानतेशी काय संबंध? हो संबंध आहे. या देशानंही माणूस महत्त्वाचा मानला आहे. माणूसच जोडला आहे. संस्कृतीच्या धाग्यांनी. मला नेमका अभिमान आहे तो या देशानं जतन केलेल्या या सांस्कृतिक संचिताचा.

भारताने कधी कोणावर आक्रमण नाही केले. उलट भारतावर कित्येक देशांनी आक्रमणे केली. इथे राज्य केले. देशातील संपत्ती, ठेवा अक्षरशः ओरबाडून नेला. कित्येक राज्यकर्त्यांनी त्यांचा धर्म, रीतीरिवाज आपल्या भारतीयांवर लादण्याचा प्रयत्न केला. थोडेबहुत लोक सोडले तर बाकी लोक या अत्याचारासमोर नमले नाहीत. म्हणूनच आपली संस्कृती टिकून आहे. आणि ही माझ्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे. अर्थात, आपण फक्त आपली संस्कृती जतन केली असे म्हणणे अर्धवट होईल. कारण भारतावर अनेक परदेशी आक्रमणे झाली. त्याचबरोबर परकीय संस्कृतीही त्यांच्यासोबत इकडे आली, नांदली. आपल्या लोकांनीही ती स्वीकारली. यातून काही नवीन संस्कृती निर्माण झाल्या तर काही संस्कृतींनी त्यांना आपल्यात सामावून घेतलं. उदा. रेवदंडा (अलिबाग) येथील Creole पोर्तुगीज. हे original पोर्तुगीज नाहीत. या लोकांच्या चालीरीती, प्रथा-परंपरा या पोर्तुगिजांप्रमाणे नाहीत ना आपल्या कोकणवासियांसारख्या. पण या दोहोंचा मिलाफ त्यांच्यात जाणवतो. हे फक्त एक उदाहरण झालं. पण भारत महान वाटावा अशा अनेक गोष्टी आहेत. नेमक्‍या याचं गोष्टी मला भारताच्या, भारतीयांच्या दिवसेंदिवस प्रेमात पडायला कारणीभूत होतात. म्हणतात ना, "स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही' म्हणून. तसचं काहीस झालंय माझं. जेव्हा मी माझं सीमित जग ओलांडून बाहेर पडले तेव्हा जाणवलं, आपल्याकडे "काही नाही' असं नाही. बस; आपण त्याचा जास्त गवगवा करत नाही. (जो खरंतर थोडातरी आपण करायला हवा). उदा. आपल्या युद्धकला, दानपट्टा, लाठीकाठी, केरळची कालारीपायपट्टू (यांचा वापर आजकाल स्वरक्षण तसेच व्यायाम म्हणून होतो आहे). आयुर्वेद, योगा, ध्यान, अध्यात्म अशासारख्या अद्‌भूत आणि जीवनोपयोगी गोष्टी भारताकडे आहेत. जर आपण बालवयापासून या गोष्टींचा जीवनशैलीत समावेश झाला तर पुढचे अवघे जीवन नक्कीच सुलभ आणि आनंदी होईल, असं मला वाटतं.

आणि हो, आपली खाद्यसंस्कृती. याबाबत एकाच देशात इतकी विविधता असणारा कदाचित या पृथ्वीवर भारत हा एकमेव देश असावा. आयुर्वेदाला प्रथिने, जीवनसत्व ही माहिती नाहीत. परंतु आयुर्वेदाचार्यांनी किंवा आपल्या पूर्वजांनी जी आहारशैली घालून दिली आहे त्यांचा अभ्यास करता हे तर दिसतेच की, आपला आहार नक्कीच परिपूर्ण आहे. आपल्याकडची कलाकुसर, आपल्या लोककला आजही जगाला आपल्याकडे आकर्षित करतात. अनेक परदेशी साधक, विद्यार्थी आपल्याकडे योग, ध्यान, लोककला शिकण्यासाठी येतात. हे सारं अभिमानास्पद नाही काय?

Hope it helps.

Similar questions