Hindi, asked by shaikhrraziq098, 1 year ago

Essay on mother in marathi for class 1st.

Answers

Answered by Anonymous
21

माझ्या आई बद्दल मी काय लिहू ? माझी आई माझा पहिला गुरु , जिने मला चालायला , बोलायला , हात धरून लिहायला शिकवले . खरंतर माझी आई खूप शिकलेली नाहीये , पण तिला शिक्षणाचे महत्व खूप लवकर कळले , आणि म्हणूनच तिने आम्हाला खूप शिकवण्याचा ठरवले . माझ्या आईने मला वाचनाची गोडी लावली . घराजवळील वाचनालयात ती मला खूप लहानपणापासून नेत असे . पुढे मोठा । झाल्यावर मी रोज एक पुस्तक वाचून काढत असे . माझ्या आईने तिच्या लहानपणी खूप कष्ट केले आहेत आणि अजून हि करतेच आहे . माझी आई सुगरण आहे . तिला वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात आणि तिने मला हि थोडा स्वैपाक शिकवला आहे . माझ्या आईने घरात कधीच मुलगा मुलगी असा भेदभाव केला नाही आणि आम्हा बहीण भावांना खूप शिकवले . माझी आई माझ्या वडलांच्या पाठीशी नेहेमी भक्कमपणे उभी राहिली आणि जमेल तशी त्यांच्या व्यवसायात त्यांना मदत सुद्धा करत आली आहे । आईने सर्व नातेवाईकांना आणि शेजा - यापाजाच्यांना आपल्या आपुलकीने आणि मायेने जोडून ठेवले आहे . कोणाला कधीही काही मदत लागली तर माझी आई सर्वात पुढे असते . अशा प्रेमळ , विविधगुणसंपन्न अशा माझ्या आईचा मला खूप अभिमान आहे .

Similar questions