essay on my birthday in marathi
Answers
दरवर्षी मी माझ्या वाढदिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असते कारण हा माझा दिवस असतो.वाढदिवसासाठी आम्ही आधीच नवीन कपडे घेऊन ठेवतो.माझी आई माझ्या वाढदिवसाला माझ्या आवडीचे पदार्थ बनवते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना घरी बोलावते.वाढदिवसाला मी रंगीत कपडे घालून शाळेत जाते. आमच्या शाळेत सुद्धा सभेच्या वेळेस ज्या मुलांचा वाढदिवस असतो त्यांना पुढे बोलावून सगळे जण शुभेच्छा देतात.संध्याकाळी माझे मित्र मैत्रिणी घरी येतात आणि माझी आई मस्त बेत करते. माझे मित्र मैत्रिणी माझ्यासाठी भेटवस्तू आणतात. संध्याकाळी आई माझा औक्षण सुद्धा करते.अशाप्रकारे मी माझा वाढदिवस साजरा करते
माझा वाढदिवस
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला खूप आनंद होतो . मी पूर्ण वर्ष या दिवसाची वाट पाहतो . त्या दिवशी मी लवकर उठतो . आंघोळ करून नवीन कपडे घालतो . घरात मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन मंदिरात जाऊन देवाचे दर्शन करतो .
शाळेत तर काय खूप मजा असते . माझ्या वर्गशिक्षिका आणि इतर मुले मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात . मी शाळेतील ग्रंथालयाला पुस्तक भेट म्हणून देतो जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल .
माझ्या वाढदिवसाला माझे सगळे मित्र घरी येतात , मला शुभेच्छा देतात आणि नवीन भेटवस्तू देतात . मग मी केक कापून सर्वांना वाटतो . आम्ही खूप मजा करतो . वेगवेगळे खेळ खेळतो . गोष्टी सांगतो . बाबा सगळ्यांचे फोटो काढतात .
माझ्या वाढदिवसादिवशी सगळे माझा खूप लाड करतात . त्या दिवशी मला कोणीच रागवत नाही . मला माझा वाढदिवस खूप आवडतो