essay on my birthday in Marathi please answer
Answers
Answer:
माझा वाढदिवस
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला खूप आनंद होतो . मी पूर्ण वर्ष या दिवसाची वाट पाहतो . त्या दिवशी मी लवकर उठतो . आंघोळ करून नवीन कपडे घालतो . घरात मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन मंदिरात जाऊन देवाचे दर्शन करतो .
शाळेत तर काय खूप मजा असते . माझ्या वर्गशिक्षिका आणि इतर मुले मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात . मी शाळेतील ग्रंथालयाला पुस्तक भेट म्हणून देतो जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल .
माझ्या वाढदिवसाला माझे सगळे मित्र घरी येतात , मला शुभेच्छा देतात आणि नवीन भेटवस्तू देतात . मग मी केक कापून सर्वांना वाटतो . आम्ही खूप मजा करतो . वेगवेगळे खेळ खेळतो . गोष्टी सांगतो . बाबा सगळ्यांचे फोटो काढतात .
माझ्या वाढदिवसादिवशी सगळे माझा खूप लाड करतात . त्या दिवशी मला कोणीच रागवत नाही . मला माझा वाढदिवस खूप आवडतो .
Answer:
वाढदिवस साजरा करणे प्रत्येकालाच आवडते. वर्षभरातून एकदा प्रत्येकाच्या जिवनात हा दिवस येतो. एखाद्याचा वाढदिवस असणे म्हणजे या दिवशी त्याचा जन्म झालेला असतो. प्रत्येक वाढदिवसाला आपले वय एक एक वर्षाने वाढत जाते. मी माझा वाढदिवस माझे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबासोबत साजरा करतो. माझा वाढदिवस दरवर्षी 16 डिसेंबर ला येतो.
आपल्या देशात आधीच्या काळात फक्त राजे महाराजे आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करीत असत. परंतु आजच्या काळात वाढदिवस साजरे करण्याचे स्वरूप बदलून गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक व्यक्ती वाढदिवस साजरा करताना दिसतो. आपल्या देशात वाढदिवसाला केक कापून पार्टी देण्याची पद्धत खूप प्रसिद्ध आहे.
माझ्या वाढदिवसाची सुरुवात माझे मित्र आणि नातेवाईकांच्या शुभेच्छानी होते. मी देखील लवकर उठून आंघोळ वैगरे करून तयार होतो. अनेक मित्र आणि नातेवाईक मला कॉल करून शुभेच्छा देतात. मोबाईल वर तर एक सेकंदही मेसेज चा गॅप पडत नाही. माझे आई वडील माझ्या वाढदिवसाला दरवर्षी घरात पूजा ठेवतात. नंतर आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतो. संध्याकाळी वाढदिवसाची पार्टी असते त्यासाठी घरात तयारी केली जाते.
वाढदिवसाच्या दिवशी मी शाळेचा युनिफॉर्म न घालता नवा ड्रेस घालून जातो. शाळेत जाताबरोबर आमच्या शिक्षकांचे पाय पडून आशीर्वाद घेतो. सर्व विषयांचे शिक्षक आणि विद्यार्थी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. शाळेत माझे मित्र वाढदिवसाला कापण्यासाठी केक आणतात. केक कापून मी त्यांना चॉकलेट व केक देतो. अशा पद्धतीने शाळेत माझ्या वाढदिवस साजरा केला जातो.
जशी संध्याकाळ झाली तसा मी नवे कपडे घालून तयार होतो. आमच्या घराला सजवले जाते. आमचे शेजारी, अनेक नातेवाईक आणि मित्र घरी येतात. माझ्या वाढदिवसाची पार्टी खूप भव्य आणि उत्कृष्ट असते. घरात गोड मिठाई व विविध व्यंजन बनवले जातात. सर्वीकडे आनंददायी वातावरण असते. येणारे प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी काही नाही गिफ्ट घेऊन येतात.
माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. डीजे लावून नृत्य केले जाते. आमच्या घरी सर्व नातेवाईकांना मेजवानी दिली जाते. माझे काही शिक्षक देखील या वाढदिवसाच्या पार्टीत येतात. माझा वाढदिवस साजरा करण्याची सुरुवात रात्री 9 वाजेपासून होते. आणि जवळपास 6 वाजेपर्यंत हा वाढदिवस साजरा केला जातो.
माझा वाढदिवस खूप छान असतो. मी दरवर्षी माझ्या वाढदिवसाची वाट पाहत असतो. कारण या दिवशी मला जो आनंद मिळतो तो इतर कोणत्याही दिवशी प्राप्त होत नाही. या दिवशी मला सर्वांकडून छान छान गिफ्ट मिळतात. इत्यादी अनेक कारणांमुळे मी दरवर्षी माझ्या वाढदिवसाची वाट पाहत असतो.