essay on my favorite flower-rose in Marathi
Answers
Answered by
537
"माझे आवडते फुल -गुलाब"
मला फुले खूप आवडतात; पण गुलाब माझे आवडते फुल आहे .
गुलाबाचे फुल फारच मनमोहक असते . गुलाबाच्या पाकळ्यांची रचना खूप आकर्षक असते . निळे, पांढरे , लाल , पिवळे असे व वेगवेगळ्य़ा रंगाचे गुलाब पहायला मिळतात . गुलाबाला 'फुलांचा राजा' मानतात .
गुलाबाचे रोपटे कुठेही लावता येते . सर्व ऋतूत गुलाबाची फुले फुलतात . त्याच्या रोपट्याला काटे असतात . गुलाब फुललेले रोपटे फारच सुंदर दिसते .
गुलाबाची फुले देवाला वाहतात . समारंभात गुलाबाच्या फुलांचा वापर करतात . कोणाचेही स्वागत करताना आपण गुलाबाचे फुल देतो. गुलाबापासून गुलकंद तयार करतात. गुलाबापासून सरबतही तयार करतात .
असा हा गुलाब मला खूप आवडतो

190
माझे आवडते फूल - गुलाब
जाई, जुई, मोगरा, गुलाब या फुलांचा सुवास बागेत सगळीकडे दरवळत असतो; परंतु या फुलांमध्ये मला गुलाबाचेच फूल फार आवडते.
गुलाबाचे फूल सुगंधी व डौलदार असते, म्हणूनच ते मोहक वाटते. जसा 'जंगलाचा राजा सिंह', 'फळांचा राजा आंबा' तसा 'फुलांचा राजा गुलाब' होय.
गुलाबाचे झाड काटेरी असते. पण याच काट्यांतून नाजूक असा गुलाब फुलतो. ताे टवटवीत दिसतो. लाल, गुलाबी, पिवळा व सफेद असे गुलाबाचे अनेक रंग असतात.
गुलाबाच्या फुलांपासून गुलकंद तयार करतात. गुलाबपाणी व अत्तरही बनवले जाते. गुलाबाचे फूल औषधी आहे. गुलाबाची फुले हारासाठी व पूजेसाठी उपयोगात आणतात. स्त्रिया गुलाबाचे फूल आवडीने वेणीत माळतात. फुलदाणीत ठेवलेला गुलाबांचा गुच्छ घराची शोभा वाढवतो.
पंडित जवाहरलाल नेहरूंना गुलाबाचे फूल फार आवडे. ते नेहमी गुलाबाचे फूल आपल्या कोटावर लावत असत.
गुलाबाचे फुल स्वतः काट्यांत राहून दुसर्याला आनंद देते, म्हणून ते मला खूप-खूप आवडते.
गुलाबाचे फूल दिसते छान |
फुलांच्या राजाचा मोठा मान ||

Similar questions