India Languages, asked by ashutoshopusgmailcom, 2 months ago

essay on my granmother in marathi​

Answers

Answered by RamArora
0

Answer:

माझी आजी एक धार्मिक महिला आहे. माझी आजी सकाळी लवकर उठून अंघोळ करते आणि सर्व प्रथम देवळात जाऊन देवाची पूजा करते. माझी आजी कधी – कधी मला सुद्धा आपल्या सोबत मंदिरात घेऊन जाते.

मंदिरात गेल्यावर मला खूप प्रसन्न वाटते. ती मला नेहमी सांगते की, सकाळी लवकर उठलं पाहिजे. कारण सूर्याची किरणे अंगावर पडली की, अन्य आजार दूर होतात.

माझी आजी नेहमी छोट्या – छोट्या गोष्टींबद्दल काळजी करत बसते. ती दररोज देवाकडे कुटुंबाच्या आनंदासाठी प्रार्थना करत असते. तसेच माझी आजी मला रात्री झोपताना गोष्टी सांगते.

Answered by Anonymous
0

आजी – आजोबा हे आपल्या जीवनातील महत्वाची दोन माणसे आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ज्याप्रमाणे आईचे अस्तित्व असते त्याच प्रमाणे आजीचे सुद्धा असते.

जशी आई प्रत्येक मुलाबाबरोबर एक सावली बनून उभी राहते तशीच आजीमध्ये एक प्रेमाची भावना आणि गोडपणा असतो. ज्या मुलाला आजीचे प्रेम मिळते तोच तिचे महत्त्व समजू शकतो.

माझी आजी

माझ्या आजीचे नाव सुनंदा पाटील असे आहे. तिचे वय ६० वर्ष आहे. ती आता खूप वृद्ध झाली आहे. तरी ती घरातील सर्व माणसांची योग्य प्रकारे काळजी घेते. ती आम्हा सर्वांवर खूप प्रेम करते. माझी आजी आजही घरातील सर्व कामे करते. तिच्यामध्ये अजूनही खूप धाडस आहे.

धार्मिक महिला

माझी आजी एक धार्मिक महिला आहे. माझी आजी सकाळी लवकर उठून अंघोळ करते आणि सर्व प्रथम देवळात जाऊन देवाची पूजा करते. माझी आजी कधी – कधी मला सुद्धा आपल्या सोबत मंदिरात घेऊन जाते.

मंदिरात गेल्यावर मला खूप प्रसन्न वाटते. ती मला नेहमी सांगते की, सकाळी लवकर उठलं पाहिजे. कारण सूर्याची किरणे अंगावर पडली की, अन्य आजार दूर होतात.

माझी आजी नेहमी छोट्या – छोट्या गोष्टींबद्दल काळजी करत बसते. ती दररोज देवाकडे कुटुंबाच्या आनंदासाठी प्रार्थना करत असते. तसेच माझी आजी मला रात्री झोपताना गोष्टी सांगते.

विविध खाद्य पदार्थ

माझी आजी खूप चांगले – चांगले खाद्य पदार्थ बनवून आम्हाला खायला घालते. मला आजीच्या हातच जेवण बनवलेल खूप आवडत.

Similar questions