ESSAY ON MY MOTHER IN MARATHI
Answers
माझी आई
स्वामी विवेकानंदांचे हे वाक्य "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी" हे अगदीच खरं आहे. आपल्याजवळ खूप धनसंपत्ती आहे, पण जर प्रेमाने, मायेने डोक्यावर हाथ फिरवणारी आई नाही तर मग आपले जीवन व्यर्थच आहे. जेव्हा एक छोट बाळ बोलायला शिकतो तेव्हा पहिले शब्द शिकतो ते माझी आई.
माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाची, आदराची व्यक्ती आहे माझी आई. सर्वगुणसंपन्न, सूंदर आहे माझी आई. प्रत्येक क्षणी, जीवनातील प्रत्येक कठीण वाटेवर माझ्या सोबत उभी एका मैत्रीणी सारख उभी राहते ती माझी आई. लहानपणा पासून मी तिला बघत आलेलो आहे. पहाटे सर्वप्रथम ती उठणार, आम्हां भावंडाना उठवणार, शाळेकरता तयार करणार, नंतर सर्वांकरता नाश्ता बनवते.
ही तिची रोजचीच दिनचर्या. सकाळी लवकर उठणे, सर्वाकरता जेवन तैयार करणे, घरकाम करणे, आजीच्या पूजेची तैयारी करणे, संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावून आम्हां भावंडाचा अभ्यास घेणे व माहिती नाही आणखी किती काम ती करते ते. आणि या सर्व गोष्टींचा एवढं केल्यानंतर ही कधीच तिच्या चेहरयावर तो त्रास नाही दिसत कि कधी कंटाळा नाही दिसत. चुकीच्या गोष्टीवर खूप रागवणारी तर तेच परीक्षेत चांगले नंबर मिळाल्यावर शाबाशी देते ती माझी आई.
एकदा तर मला खूप ताप आला होता, तेव्हा ती रात्रभर माझ्या शेजारी बसून थंड्या पाण्याची पट्टी माझ्या माथ्यावर ठेवत होती जो पर्यंत ताप कमी झाला नाही. सदा न कदा माझ्या आवड़ी -निवड़ीची काळजी घेत असते माझी आई. घरात प्रत्येकाच्या आवडी निवडी जपत असते ती.
मला जे चांगले संस्कार लाभले आहेत ते तुझीच देणगी आहे. मला खूप अभिमान वाटतो कि मला इतकी चांगली आई भेटली. मी कितीही आई बद्दल लिहिले तरी ते कमीच वाटणार….आणि म्हणूनच आईला नेहमी आनंदात ठेवणं व माझ्याकरिता तिने जे कष्ट घेतलय त्याच चीज करणं हेच माझ्या जीवणाचं खरं उद्देश्य आणि लक्ष्य आहे.Answer:
My mother is an ordinary woman she is my superhero. In every step of my, she supported and encouraged me. Whether day or night she was always there for me no matter what the condition is. Furthermore, her every work, persistence, devotion, dedication, conduct is an inspiration for me.