India Languages, asked by simranjan27, 1 year ago

ESSAY ON MY MOTHER (MARATHI)

Answers

Answered by Anonymous
5
आईएखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. मराठीमधला आई हा शब्द मानवी भावनांशी निगडित असून त्यास माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झालेले आहे. अनादी अनंत काळापासून आई म्हणजे निस्सीम प्रेमाचे आणि माया-ममतेचे प्रतीक समजले गेले आहे. आई या विषयावर अनेकांनी काव्येआणि निबंध लिहिले आहेत. रामायणातील महानायक श्रीरामचंद्रानीही, स्वर्णमयी लंकेपेक्षाच काय, पण स्वर्गापेक्षाही आपली जन्मभूमी अयोध्या श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी जन्मभूमीची आईशी बरोबरी केली आहे. ते म्हणतात, "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी". मराठीमध्येही आई या विषयावर अनेक कविता रचलेल्या आहेत. मराठीतील कवी यशवंत यानी आपल्या कवितेत पुढील ओळ लिहून आई या शब्दाची महानताच थोडक्यात सांगितलेली आहे. "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी "

Anonymous: just write it and add more lines by ur self
simranjan27: ill try ty
simranjan27: from which website?
Anonymous: by myself i have written
simranjan27: cool
Anonymous: mark it as best plz
simranjan27: i did
simranjan27: xD
Anonymous: u have not when there wil 2 ans then there is 1 option to do that
simranjan27: ok imma wait for 2 answrs
Answered by Anonymous
2

Answer:

माझ्या आई बद्दल मी काय लिहू? माझी आई माझा पहिला गुरु, जिने मला चालायला , बोलायला, हात धरून लिहायला शिकवले. खरंतर माझी आई खूप शिकलेली नाहीये, पण तिला शिक्षणाचं महत्व खूप लवकर कळले, आणि म्हणूनच तिने आम्हाला खूप शिकवण्याचा ठरवले. माझ्या आईने मला वाचनाची गोडी लावली. घराजवळील वाचनालयात ती मला खूप लहानपणापासून नेत असे. पुढे मोठा झाल्यावर मी रोज एक पुस्तक वाचून काढत असे. 

माझ्या आईने तिच्या लहानपणी खूप कष्ट केले आहेत आणि अजून हि करतेच आहे. माझी आई सुगरण आहे.  तिला वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात आणि तिने मला हि थोडा स्वैपाक शिकवला आहे.

माझ्या आईने घरात कधीच मुलगा मुलगी असा भेदभाव केला नाही आणि आम्हा बहीण भावांना खूप शिकवले.माझी आई माझ्या वडलांच्या पाठीशी नेहेमी भक्कमपणे उभी राहिली आणि जमेल तशी त्यांच्या व्यवसायात त्यांना मदत सुद्धा करत आली आहे

आईने सर्व नातेवाईकांना आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांना आपल्या आपुलकीने आणि मायेने जोडून ठेवले आहे. कोणाला कधीही काही मदत लागली तर माझी आई सर्वात पुढे असते.

अशा प्रेमळ, विविधगुणसंपन्न अशा माझ्या आईचा मला खूप अभिमान आहे.

Explanation:

Similar questions