English, asked by akshaypaswan1984, 5 months ago

essay on निसर्ग माझा सोबती मराठी निबंध in marathi​

Answers

Answered by Vaibhavibade
1

Answer:

आजच्या युगात निसर्ग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अनेक प्रसिद्ध कवी, लेखक, चित्रकार व कलाकार यांनी निसर्गाबद्दल अनेक सुंदर रचना केल्या आहेत. आपल्या सभोवताली असलेले पाणी, हवा, जंगल, पर्वत, नदी, झाडे, भूमी, सूर्य, चंद्र, आकाश, समुद्र इत्यादी गोष्टींपासून निसर्ग बनतो. निसर्ग अनंत रंगांनी भरलेला आहे ज्याने आपल्या कुशीत सजीव निर्जीव सर्व जीवांना सामावून घेतले आहे.

खरे पाहता निसर्ग हा आपला मित्र आहे. कारण निसर्ग हीच ती शक्ती आहे की आपल्याला विश्वात सर्वकाही देते. मग ते आपले अन्न असो वा जीवन. निसर्गामध्ये ती शक्ती आहे जी शरीरातील सर्व रोगांना दूर करते. वृक्षांची हिरवळ पाहून मानसिक ताणतणाव कमी होतो. म्हणून जर कधीही तुम्हाला मानसिक तणाव निर्माण झाला असेल तर बागेत जाऊन फिरून या. बागेतील निसर्ग सौंदर्य पाहून मनाला मानसिक शांती लाभेल. निसर्ग आपल्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांना सहज पूर्ण करतो.

निसर्गाने आपल्याला सुंदर हिरवळ दिली आहे. निसर्गाने आपल्याला प्राणवायू दिला आहे. हा प्राणवायू आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. ऑक्सिजन या प्राणवायू शिवाय आपण फक्त काही क्षण जीवंत राहू शकतो. मनुष्याला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा त्याला अन्नातून प्राप्त होते, व हे अन्न देखील निसर्गच उपलब्ध करून देतो. आपल्याला राहण्यासाठी जमीन निसर्गाने दिली आहे. या धरतीवर बनवलेले घर सुद्धा निसर्गात उपलब्ध झालेल्या वस्तूं पासून बनवण्यात आले आहे

Explanation:

hope it helps..

Similar questions