Environmental Sciences, asked by TheRealSardar5180, 1 year ago

Essay on naisargik sadhan sampati which apli sampati

Answers

Answered by Anonymous
6

निसर्गाने अनेक प्रकारच्या साधनांची सोय करून दिल्यामुळे मानवजातीची प्रगती झाली. मुबलक प्रमाणात खनिजे, लाकडे, पाणी, नैसर्गिक इंधने जसे तेल, कोळसा, वायू वगैरे वापरून आपण आपले आयुष्य सुखकर केले. पण या सर्व वाटचालीत निसर्गातल्या साधन संपत्तीची घट होऊन पुढल्या पिढयांसाठी काही शिल्लक राहणार नाही असे भीषण चित्र दिसायला लागले आहे.

निसर्गातल्या काही संपत्तीत घट झाली तरी काही स्रोत घटणार नाहीत. जसे सूर्य प्रकाश, पाणी, हवा. मग यांचा उपयोग जास्त करून इतर नैसर्गिक साधनांचा वापर कमी केला तर ती जास्त दिवस पुरतील.

या दृष्टीने विचार करून अशा साधन संपत्तीचा वापर जाणीव पूर्वक पद्धतीने कमी करणे आवश्यक झाले आहे.

प्रथम समजावून घेऊ या कि काही नैसर्गिक साधन संपत्ती एकदा वापरल्यावर पुन्हा वापरता येत नाही. यात तेल, कोळसा, इंधन वायू , खनिजे, सुपीक जमीन यांचा समावेश होतो.

पण पाणी, शेतीपासून निर्माण होणारा कचरा वगैरे गोष्टींचा पुन्हा वापर करणे शक्य असते. तसेच वारा, लाटा, सूर्यप्रकाश आदींपासून विजेची निर्मिती दीर्घकालीन होऊ शकते. मग या साधन संपत्तीचा जास्तीत जास्त वापर वाढवायचा.

वापर टाळा, वापर कमी करा, पुन्हा वापर करा किंवा दुसऱ्या प्रकाराने वापर करा असे चार पर्याय उपलब्ध असतात.

म्हणजे जर आपण प्लास्टिक च्या पिशव्या वापरत असू, तर प्लास्टिक ऐवजी काही दुसरा पर्याय शोधता येईल कां?

जर दुसरा पर्याय उपलब्ध नसेल तर पिशव्यांचा आकार छोट्यात छोटा कसा करता येईल?

त्या पिशव्या पुन्हा वापरायाची पद्धत अमलात आणू शकतो कां?

पिशव्यांचा वापर संपल्यावर त्या गोळा करून त्यावर काही प्रक्रिया करून त्याच्या काही दुसऱ्या वस्तू बनवता येतील कां?

आपल्या कारखान्यात पाणी किती वापरले जाते? अनेकांना याची योग्य कल्पना देखील नसते. काही पाणी पिण्यासाठी, काही प्रसाधनगृहात तर काही प्रोसेसमध्ये वापरले जाते. काही पाणी माल थंड किंवा गरम करण्यासाठी वापरले जाते, तर काही ठिकाणी बॉयलर मध्ये किंवा एअर कंडीशनच्या कुलिंग सिस्टीम मध्ये वापरले जाते. शेवटी अशुद्ध पाणी सांडपाणी म्हणून गटारात सोडून दिले जाते.

जर डोळसपणे आपण आपल्या कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा आढावा घेतला तर पाण्याचा , प्लास्टिकचा , तसेच कागदाचा वापर कमी करू शकतो. अनेक कंपन्यांमध्ये छापील पानांच्या मागच्या मोकळ्या बाजूचा पुन्हा वापर होताना दिसतो.

हल्ली गरम पाण्याची गरज सोलर हिटर वापरून पूर्ण केली जाते. सूर्यप्रकाशाचा असा वापर जितका जास्त करता येईल तितके जास्त चांगले. सोलर उर्जेचा वापर पण हळूहळू वाढत नेला पाहिजे.

नैसर्गिक इंधनांचा ( तेल, कोळसा, नैसर्गिक वायू ) वापर कमी करून शेतीमालातील त्याज्य घटकांचा वापर करण्याचे आव्हान स्वीकारणे जरुरी आहे.

या सर्व गोष्टी साध्य करायच्या असतील तर सद्य स्थिती जाणून घेऊन त्याची नोंद करणे सुरु केले पाहिजे.

Answered by Anonymous
2

Answer:

Explanation:

नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करताना आपण पर्यावरणाची हानी तर करीत नाही ना, हा प्रश्न प्रत्येकाला पडायला हवा. आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अतिवापरामुळे पुढच्या पिढीला त्याचे घातक परिणाम भोगावे लागणार आहेत, असे मत पर्यावरण तज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

वाचन संस्कृती टिकून राहावी आणि नवीन पिढीवर वाचनाचे संस्कार व्हावेत या उद्देशाने बाजीराव रस्त्यावरील अक्षरधारा बुक गॅलरीच्या वतीने मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ‘वाचू आनंदे बालकुमार शब्दोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत दिलीप कुलकर्णी यांची ‘मैत्री पर्यावरणाची, ओळख निसर्गाशी’ या विषयावर मुलाखत घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. वीणा लिमये व सई लिमये यांनी कुलकर्णी यांची मुलाखत घेतली. पुण्यामध्ये जन्म झालेले कुलकर्णी २० वर्षांपूर्वी पर्यावरण जगण्यासाठी म्हणून कोकणातील एका खेडय़ात सहकुटुंब स्थायिक झाले. त्यांना शहर सोडून गावात जाऊन का राहावेसे वाटले, त्यांना हा बदल कितपत खडतर वाटला, ग्रामीण जीवन कसे वाटले यासारखे विविध अनुभव त्यांनी उपस्थितांना सांगितले. ते म्हणाले, ‘पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वानीच आपले शहर सोडून गावामध्ये स्थायिक होणे शक्य नाही; पण आपल्या दैनंदिन जीवनातील छोटय़ा-छोटय़ा सवयींमध्ये पर्यावरणाच्या संदर्भातला सुज्ञपणा जाणवायला हवा.’ शहरात नेहमी चंगळवाद बोकाळलेला जाणवतो. तो कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल या विषयीचे एक गीतही त्यांनी उपस्थित लहान-मोठय़ांना या वेळी शिकवले.

Similar questions