Hindi, asked by mahek5678, 1 year ago

essay on Navratri in Marathi

Answers

Answered by Anirban1108
48
नवरात्र / नवरात्री काय आहे, कधी आहे?

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव मोठया उत्साहात आनंदात साजरे केले जातात. त्यापैकीच नवरात्र हा देवीचा उत्सव भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतो.गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर वेध लागतात ते नवरात्रीचे. त्यावेळी मधील पितृपंधरवडा कधी संपतो ते कळतच नाही. अश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. या नवरात्र उत्सवाला शारदीय नवरात्र असेही म्हणतात. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते. तसेच सार्वजनिक मंडळामध्ये देवीच्या मूर्तीची स्थापना करतात. यावर्षी म्हणजेच २०१८ मध्ये येणारा हा नवरात्र उत्सव १० ऑक्टोबर पासून चालू होणार आहे आणि १८ ऑक्टोबर रोजी दसरा आहे.

नवरात्रीचे नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा, आरती तसेच सेवा केली जाते. घटस्थापना करताना देवीसमोर घट उभारला जातो. यामध्ये एका टोपलीमध्ये काळी माती घेऊन त्या मातीमध्ये नऊ धान्य पेरली जातात. त्या मातीमध्ये एक पाण्याने भरलेले मडके ठेवले जाते. त्या मडक्यावर विड्याची पाने ठेऊन त्यावर नारळ ठेवला जातो. घटाच्यावर पाच फळे बांधली जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटाला विड्याच्या पानांची माळ घालतात. त्यानंतर घटाला तिळाच्या फुलांची किंवा झेंडूच्या फुलांची माळ घालतात.

नवरात्रातील नऊ दिवस देवीसमोर अखंड दिवा तेवत ठेवला जातो. सर्वजण मनोभावे देवीची पूजा आरती करतात. बरेच लोक नऊ दिवस उपवास करून अनवाणी राहून हे देवीचे व्रत पूर्ण करतात. तर काही जण उठता-बसता म्हणजेच घट बसण्याच्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशी उपवास करतात. दसऱ्याच्या आदल्या दिवशी देवीसमोर होमहवन केले जाते. काही सार्वजनिक मंडळे भजन, कीर्तनाचे सुद्धा आयोजन यावेळी करतात. तसेच नवरात्रीच्या सातव्या दिवशी घटाला कडाकण्या बांधतात. या कडकण्यांसोबतच घटाला पिठाची वेणी, फणी, कंगवा, विऱोध्या, मंगळसूत्र, जोडाव्या असा स्त्रीचा संपूर्ण साज बांधला जातो.

नवरात्रीच्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी, आठव्या दिवसाला महाअष्टमी, तर नवव्या दिवसाला महानवमी असे म्हणतात. नवरात्रीचे नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात. देवीप्रमाणेच सर्व स्त्रियाही नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करून देवीची मनोभावे पूजा करतात. दरवर्षी हे नऊ दिवसाचे नऊ रंग धर्मशास्त्रज्ञांनी ठरविलेले असतात. त्यानुसार देवीला त्या त्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात.

देवीने नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा वध केला तसेच महिषासुराचा वध केला, म्हणूनच तर देवीला महिषासुरमर्दिनी असे सुद्धा म्हटले जाते. नवरात्रीमध्ये जागोजागी देवीसाठी मंडप उभे केले जातात. सजावट केली जाते. तसेच या सर्व मंडळांतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. गरबा, दांडिया यांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये लहान मुली, स्त्रिया आणि पुरुषही सहभागी होताना दिसतात. अशाप्रकारे सगळीकडेच नऊ दिवस उत्साहाचे वातावरण असते.

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मंडळांमध्ये, काही सार्वजनिक ठिकाणी तसेच सोसायटीमध्ये भोंडल्याचे आयोजन केले जाते. एका पाटावर हत्ती काढून तो मधोमध ठेवतात आणि त्याच्याभोवती फेर धरून सर्वजण भोंडल्याची गाणी म्हणतात. सर्वजण आपापल्या घरून भोंडल्याची खिरापत आणतात. आणि भोंडला झाल्यानंतर ती एकमेकांना ओळखायला सांगतात. त्यानंतर सर्वजण मिळून खिरापत खातात.

नवरात्रीचे नऊ दिवस सर्व देवीच्या मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळते. सर्व महिला पहाटे लवकर उठून जवळच्या देवीच्या मंदिरामध्ये जातात. बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये महिलांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन केले जाते.काही ठिकाणी तर देवीच्या मंदिराजवळ नऊ दिवस यात्रा असते. त्यामुळे मोठ्यांसोबतच लहान मुलांचीही खूप गर्दी पाहायला मिळते.

Please Mark As the Brainliest
Answered by Priatouri
22

नवरात्र हा हिंदू सण आहेI या उत्सवात नऊ दिवस नऊ महिलांची पूजा केली जाते I वर्षात चार वेळा नवरात्र येते I पौष, चैत्र, आषाढा, अश्विन प्रतिपदापासून नवमीपर्यंत साजरा केला जातो I नवरात्रातील नऊ रात्री महालक्ष्मी, महासरस्वती किंवा सरस्वती आणि दुर्गा या तीन देवींच्या नऊ प्रकारांची पूजा केली जातेI या नऊ रात्री आणि दहा दिवसात शक्ती / देवीच्या नऊ प्रकारांची पूजा केली जाते. दुर्गा म्हणजे जीवनातील त्रास दूर करणे I नवरात्र हा एक महत्त्वाचा प्रमुख सण आहे जो संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो I

Similar questions