Essay on newspaper in marathi - वृत्तपत्रावर निबंध लिहा
Answers
I am in Gujarat I don't know Marathi
वृत्तपत्राला समाजाचा आरसा म्हटले जाते. वृत्तपत्र चालू घडामोडी, आर्थिक विश्लेषण,सामाजिक न्याय इ. चे माहेरघर असते. दररोज सकाळी पुष्कळ लोक अंथरुणावरून उठताच फक्त वृत्तपत्र आला का ह्याची चौकशी करून घेतात. कारण वृत्तपत्र त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक आधारस्तंभ असतो. राजनीतीत छंद बाळगणाऱ्या लोकांसाठी, शेअर बाजार मध्ये गुंतवणुकीच्या इच्छिकांसाठी, रोजगाराच्या संध्या शोधणाऱ्या युवकांनाही फक्त वृत्तपत्राची वाट असते.
पूर्वी मोठमोठे आंदोलने वृत्तपत्राच्या जोरावर झाली आहेत. इंग्रजांच्या दमणकारी नीतीवर सडेतोड प्रहार वृत्तपत्रांनीच शक्य झाले होते. अस्या उपयुक्त आणि मौल्यवान वृत्तपत्राचा इतिहास हि खूप दांडगा आहे. मराठी वृत्तपत्रात बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण वृत्तपत्राला खूप मोलाचे स्थान आहे.
वृत्तपत्रात मासिक, पाक्षिक, साप्ताहिक,दैनिक, वार्षिक, अर्धवार्षिक असे कितीतरी प्रकार आहेत. वृत्तपत्रात मुखपृष्ठ, अग्रलेख,, खेळ समाचार,हवामान, छोट्या जाहिराती, क्षेत्रीय इ. भाग असतात. साधारणतः वृतपत्र मुद्रित असतात त्याला प्रिंट मीडिया असे म्हणतात.