History, asked by Suvarnakadam305gmail, 1 year ago

essay on olympic rio in marathi

Answers

Answered by ayush8209master
17
रिओ २०१६ ऑलिम्पिक

क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेचे यंदाचे पर्व ५ ते २१ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाचा मान यंदा ब्राझीलच्या रिओ दी जानेरो या शहराला मिळाला असून, याकाळात हे शहर क्रीडा रसिकांनी बहरलेले पाहायला मिळेल. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेशी निगडीत प्रत्येक बातमी तुम्हाला येथे पाहाता येईल. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये २०६ देशांचे एकूण १०,५०० खेळाडू आपल्यातील कौशल्य दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोसोवो आणि दक्षिण सुदान हे देश यंदा पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पदकांच्या एकूण ३०६ सेटसाठी यावेळी चुरस पाहायला मिळणार आहे. रग्बी आणि गोल्फचा यंदा पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. रिओसोबतच साऊ पावलो, बेलो होरिजोंटे, सेल्वेडोर, ब्राजीलिया आणि मनाऊसमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दक्षिण अमेरिकेत पहिल्यांदाज ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन दर चार वर्षांनी केले जाते. ऑलिम्पिक स्पर्धेची सुरूवात ग्रीसपासून झाली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या स्थापनेनंतर १८९६ मध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन झाले. ऑलिम्पिक स्पर्धेचे यंदाचे २८ वे वर्ष आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनावर २९.६ अब्ज डॉलरचा खर्च आला आहे. स्पर्धेचे बोधचिन्ह ब्राझील स्थित तातिल डिझाईन कंपनीने तयार केले असून, त्याचे अनावरण ३१ डिसेंबर २०१० सालीच करण्यात आले होते. रिओने माद्रीद, टोकियो आणि शिकागो या शहरांना मागे टाकून ऑलिम्पिकचे यजमानपद प्राप्त केले आहे.

Similar questions