India Languages, asked by Kdinga6673, 11 months ago

Essay on One hour at railway station in marathi

Answers

Answered by halamadrid
15

Answer:

एकदा माझे आजी आजोबा आम्हाला भेटण्यासाठी गावावरून ट्रेनमधून येत होते.त्यांना घेण्यासाठी मी रेल्वे स्थानकावर गेले होते.ट्रेन उशिरा धावत असल्यामुळे,मला रेल्वे स्थानकावर थांबावे लागले.

रेल्वे स्थानकावर लोकांची खूप गर्दी होते.काही लोकांना ट्रेनसाठी थांबून थांबून कंटाळा आला होता.काही लोकांच्या गप्पा चालू होत्या.काही लोक मोबाईलमध्ये व्यस्त होते,तर काही वृत्तपत्र वाचत होते.

खायच्या स्टॉलवर लोकांची गर्दी होती.रेल्वे स्थानकावर लोकांचे येणे जाणे सुरुच होते,ट्रेन येत जात होत्या.प्लेटफॉर्मवर कुली दिसत होते.टिकेट काउंटर वर लोकांची गर्दी दिसत होती.

ट्रेन येताच लोकांची ट्रेनमध्ये चढण्याची घाई व्हायची.कधीकधी धक्काबुक्की ही व्हायची.

तिथे काही लोक स्वच्छता पाळत नव्हते. कुठेही थूकत होते.कुठेही कचरा टाकत होते.मला ही गोष्ट आवडली नाही.

इतक्यातच आजी आजोबांची ट्रेन आली.मी त्यांना ट्रेनमधून उतरायला मदत केली आणि आम्ही घरी आलो.

असा हा रेल्वे स्थानकावर घालवलेला एक तासाचा अनुभव माझ्यासाठी खूप नवीन व वेगळा होता.

Explanation:

Similar questions