India Languages, asked by xxsomeoneshizukaxx40, 11 hours ago

essay on paryavaran
in marathi

Answers

Answered by harishupret22
5

Answer:

Hope it helps you :)

Explanation:

पर्यावरण वर मराठी निबंध

प्रस्तावना

मानव आणि पर्यावरण या दोघांचा भरपूर पुराना संबंध आहे. या पर्यावरणातून मानवाला अनेक गोष्टी प्राप्त होतात. त्या सर्वच उपयोग मानव आपल्या जीवनामध्ये करतो.

या पृथ्वी जर कोणी बुद्धिमान प्राणी असेल तर तो म्हणजे – मानव. कारण मानवाने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून या पर्यावरणाकडून आपल्याला हवा तास विकास करून घेतला.

परंतु त्या बदल्यात तो पर्यावरणाचे परतफेड करायला विसरला. या पर्यावरांतून मानवाला सर्व काही मिळाले. परंतु त्या बदल्यात त्याने मानवाकडे कधीच काही मागितले नाही.

पर्यावरणाची व्याख्या

पर्यावरण म्हणजे – आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजेच झाडे, प्राणी, पशु – पक्षी, डोंगर, नद्या, वायू, भूमी ह्या सर्व म्हणजे ‘पर्यावरण’ होय.

पर्यावरणात मिळणाऱ्या गोष्टी

या पर्यावरणातून मानवाला फळ, फुल, भोजन आणि इंधन प्राप्त होते. याचा उपयोग मानव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. तसेच मानवाला शुद्ध हवा मिळते.

त्याचप्रमाणे सर्व सजीव सृष्टीला आणि मानवाला जीवन जगण्यासाठी शुद्ध ऑक्सिजन मिळतो. तसेच पर्यावरण आपल्याला पिण्यासाठी पाणी, घरे बांधण्यासाठी लाकूड इ सर्व काही देतो.

झाडांचा उपयोग

वृक्ष हे पर्यावरणाचा एक महत्वाचा घटक आहेत. या झाडांचा उपयोग मनुष्य इंधनाच्या रूपाने आपल्या जीवनामध्ये करतो. झाडे मानवाला ऑक्सिजन देण्याचे काम करतात.

कारण मानव अन्नाशिवाय आणि पाण्याशिवाय काही दिवस राहू शकतो. परंतु ऑक्सिजन शिवाय मानव जिवंत राहू शकत नाही. तसेच मानव झाडांपासून उद्योगांना लागणार कच्चा माल तयार करतो.

त्याच बरोबर रबर, माचीस आणि अन्य औषधे सुद्धा तयार करतो. मानव झाडाच्या लाकडा पासून दरवाजे, खिडक्या आणि अन्य प्रकारची लाकडी खेळणी तयार करतो.

पर्यावरणाला नुकसान

आज मानवाची जसजशी प्रगती होऊ लागली तसतशी मानवाची गरज वाढू लागली आहे. आज मानव आपल्या मूलभूत गरज आणि सुख – सुविधा पूर्ण करण्यासाठी या पर्यावरणाला नुकसान पोहचवत आहे.

तसेच आपल्या स्वार्थापायी झाडांची तोड करत आहे. त्यामुळे अन्य प्रकारचे प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या संकटाना सामोरे जावे लागत आहे.

त्याच बरोबर कमी होत जाणारी पाण्याची पातळी, पावसाची अनियमितता, वाढणारा दुष्काळ इ संकटे समोर येत आहेत. या पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यास मानवच जबाबदार आहे.

जंगली प्राण्याचे अस्तित्व धोक्यात

या पर्यावरमध्ये विभिन्न प्रकारचे प्राणी राहतात. ज्या प्रमाणे मानवाला राहण्यासाठी घराची आवश्यकता असते. त्याच प्रमाणे जंगल आणि वन हे पशु – पक्ष्यांचे निवास स्थान आहे. कारण बहुतेक पक्षी झाडांवर आपला घरटा बांधून राहतात.

तसेच जंगली प्राण्याचे जंगल हे घर आहे. आज मानव जंगलतोड करून शहरे निर्माण करता आहे त्यामुळे प्राण्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. तर काही वर्षांपासून अनेक पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या प्रजाती या नष्ट होऊ लागल्या आहेत.

पर्यावरण दिवस

मानवाला या पृथ्वीवरील आपले जीवन चालू ठेवण्यासाठी पर्यावरणाची मौलिकता टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

म्हणून आमच्या भारत देशामध्ये दरवर्षी ५ जून ला जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व लोकांमध्ये जागरूकता निर्मण केली जाते आणि त्यांना पर्यावरणाचे महतव पटवून दिले जाते.

निष्कर्ष

आपण सर्वाना पर्यावरण वाचविण्यासाठी आणि शुद्ध वातावरण ठेवण्यासाठी सर्वात पहिले झाडे लावा, झाडे जगवा हे ब्रीदवाक्य लक्ष्यात घेऊन ते आत्मसात केले पाहिजे. एक कुटुंबातून एक जरी झाड लावून त्याचे जातं केले तरी याचा पर्यावरणावर चांगला परिणाम होईल.

जेव्हा या पृथ्वीवरील सर्व देश आणि देशातील सर्व लोक पर्यावरणबाबत जागरूक होतील तेव्हाच आपली पृथ्वी सुजलाम – सुफलाम बघु शकेल.

referred from - hindi screen official

Answered by pds39937
1

Answer:

Ohk.. wanna like to be my friend?

give me ur intro.. miss

from which place you belonged?

Attachments:
Similar questions