essay on pavsache mahatva in marathi
Answers
Explanation:
लंडन शहराला होणारा पाणी पुरवठा प्रामुख्याने थेम्स नदी, त्याचप्रमाणे लहान लहान नद्यांचे पाणी एकत्रितरित्या साठवून करण्यात येते. जलसाठे तयार करण्यात आले असून (Reservoirs) त्यामध्ये पावसाचे पाणी साठविण्यात येते. नदीमध्ये बांध घातले आहेत, जे फिरते आहेत. (River Locks) नदीपात्रातील पाण्याची उंची कमी झाली की दोन बांधांमधील साठविलेले पाणी सोडण्यात येऊन नदीपात्रात आवश्यक पाण्याची पातळी राखली जाते. नदीच्या बाजूकडील भागात असलेल्या विंधण विहिरींतील (Borewell) पाणी आवश्यकतेप्रमाणे नदीपात्रात सोडण्यात येते.
2. नदीतील किंवा अन्य जलाशयातील पाणी कमी व्हावयास लागले, (जो पाणी पुरविण्याचा प्रमुख स्त्रोत आहे) की दूरदर्शनवरून नागरिकांना त्याची कल्पना देण्यात येते. अशा वेळी, बागकामासाठी, गाड्या धुण्यासाठी होज पाईपचा (रबरी पाईप) वापर न करता, झारीने पाणी देण्याचे आवाहन केले जाते, जेणेकरून पाण्याची बचत होईल, आणि त्याप्रमाणे पाण्याच्या वापराचा अवलंब केला जातो. पाणी म्हणजे राष्ट्रीय संपत्ती म्हणून पाहिले जाते. अशावेळी होज पाईपचा वापर केल्यास नियमाप्रमाणे दंडाची तरतूद आहे तथापि, जनमानसात जागरूकता एवढी आहे की दंड करण्याची वेळ येत नाही. घरांच्या परिसरात, रस्त्यांमध्ये पाणी वाहिलेले आठवत नाही, पाण्याचा अपव्यय नाहीच.
3. इंग्रज माणसांना बागकामाचा छंदच आहे. प्रत्येक घराभोवती बाग असतेच असते. आणि झाडांना वेगवेगळे आकार देऊन बाग सुशोभित करण्याचा प्रयत्न केला जातो. बागेसाठी पाणी लागणारच/यासाठी फायबरच्या टाक्यात छतावर पडणाऱ्या पावसाचे पाणी पन्हाळीतून संकलित करण्यात येते. या टाकीला खालच्या बाजूला तोटी राहते आणि त्याद्वारे बागकामासाठी पाण्याचा वापर करण्यात येतो. आवश्यकतेप्रमाणेच पाणी दिले जाते, त्यामुळे कुठेही पाणी वाहून जातय्, बागेत दलदल झालीय् असे दिसून येत नाही. बरं, लंडनमध्ये वर्षभर लहान मोठ्या प्रमाणात (कमी / अधिक) पाऊस राहतोच, म्हणून टाक्यामध्ये पाणी साठतेच. विशेषत: शनिवार-रविवार सुट्ट्यांच्या दिवशी घरातील इतर कामांबरोबर बागकामाचा छंद जोपासतांना आणि पाण्याचा योग्य वापर करतांना लोक दिसून येतात. यामध्ये वृद्ध दांपत्यांची संख्या काही प्रमाणात अधिकच दिसून येते.
Answer:
Explanation:
पाण्याचे महत्व
पाणी म्हणजे जल, आणि जल हे जीवन आहे या वाक्यावरण पाण्याचं या सृष्टीवर काय महत्व आहे ते जाणवते. कारण पृथ्वी वरील सर्व सजीवांचे जीवन पाण्यावरच अवलंबून आहे.
पृथ्वी वरील सर्व जीवांना जिवंत राहण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण सदासर्वकाळ योग्य व पुरसे ठेवावे लागते. शरीरातील पाण्याच प्रमाण १० टक्कयाहून कमी झाले तर कोणताच सजीव जिवंत राहू शकत नाही. मानवी शरीर अन्नाशिवाय काही आठवडे जीवंत राहू शकतो पण पाण्याशिवाय सात दिवसापेक्षा जास्त दिवस तो जगूच शकत नाही.
मनुष्याला फक्त पिण्यासाठी नाही तर आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी म्हणजेच अनेक नित्योपयोगी गोष्टींसाठी पाणी आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्रात पाण्याची आवश्यकता असते. ऊर्जानिर्मितीसाठी पाणी हेच माध्यम आहे. शेती करण्याकरता तर पाण्याची गरज सर्वात मोठी आहे..
दिवसें न दिवस वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण, जंगल तोड, जल प्रदूषण, कमी पाऊस, आटते जलस्त्रोत, उपलब्ध जलसाठ्यांचा गैरवापर यांच्यामुळे पाणी ची टंचाई जाणवत आहे. व हा एक गंभीर मुद्दा बनला आहे. आणि पाणी टंचाई चा प्रश्न मनुष्यच सोडवू शकतो. जर प्रत्येक व्यक्ती पाण्याचे महत्व समजून त्याचा सांभाळून उपयोग करेल तर मग कधीही पाण्याची कमतरता भासणार नाही. म्हणतात न थेंबे थेंबे तळे साचे.