India Languages, asked by DheerajMehlawat2134, 10 months ago

Essay on pet dogs in Marathi language

Answers

Answered by AadilAhluwalia
1

* माझा पाळीव कुत्रा*

माझ्या पाळीव कुत्र्याचे नाव राजा आहे. माझा राजा 'पग' जातीचा आहे. गेल्या वर्षी वाढदिवसाची भेट म्हणून बाबांनी 'राजा'ला दत्तक घेतले होते. माझा राजा ३ वर्षांचा आहे.

मला लहानपणापासून कुत्रे खूप आवडतात. मी एकदा एक पिल्लू रस्त्यावरून उचलले होते आणि त्याला घरी आणले होते. बाबा आधी रागावले होते पण नंतर त्यांनी त्याला घरी ठेवण्याची परवानगी दिली. तो माझा पहिला पाळीव कुत्रा 'रिकी' होता. आजारपणामुळे तो चार महिन्यात वारला. त्या नंतर माझे मन उडाले आणि मी दुसरा कुत्रा आणला नाही. पण नंतर राजा आला आणि मला रिकी परत आल्यासारखे वाटले.

मी आणि राजा खूप खेळतो. मी उदास असलो कि राजा माझा जवळ येतो आणि मग मी सगळं दुःख विसरतो. मी त्याला रोज संध्याकाळी फिरायला नेतो. राजाला चेंडूने खेळायला आवडते. मी चेंडू फेकला कि तो जाऊन घेऊन येतो. तो कधीच थकत नाही. आताच एक कुत्र्यांचा स्पर्धेत राजा पहिला आला. त्याला नवीन मित्र बनवायला माजा येते. माझ्या सर्व मित्रांना राजा फार आवडतो.

Similar questions