India Languages, asked by kawtharshafa359, 11 months ago

essay on preranadayi stri in marathi

Answers

Answered by Anonymous
1

Explanation:

इतिहासामध्ये बरीच नावे आहेत ज्यांनी हे सिद्ध केले आहे की स्त्रियांची शक्ती अफाट आहे, आपला प्रवास यशस्वी करण्यासाठी तिने तिचे मन तयार केले आहे, कोणीही तिला रोखू शकत नाही! या सुप्रसिद्ध महिलांची कहाणी वाचल्यानंतर प्रत्येक स्त्रीला समजेल की कोणतीही स्त्री कोणत्याही परिस्थितीत विचार न करता आपल्या जोमाने समाजात योगदान देऊ शकते. स्त्री कोणत्या क्षेत्राची किंवा वातावरणाची आहे याची पर्वा नाही. पुढे वाचा आणि असे काहीतरी विलक्षण करा ज्यामुळे समाजाचा चेहरा अस्पष्टपणे बदलू शकेल.

Answered by halamadrid
0

■■प्रेरणादायी स्त्री■■

माझ्यासाठी प्रेरणादायी स्त्री राणी लक्ष्मीबाई आहेत.भारताच्या इतिहासामध्ये राणी लक्ष्मीबाई यांचा मौलाचा वाटा आहे. आजसुद्धा भारताचा प्रत्येक नागरिक त्यांची आठवण काढतो. त्यांची जीवनकथा, त्यांनी केलेले संघर्ष, देशासाठी केलेले बलिदान आज ही आपल्याला प्रेरणा देतात.

राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म वाराणसी येथे झाला होता.त्यांचे खरे नाव मणिकर्णिका असे होते.लहानपणापासूनच त्या धाडसी स्वाभावाच्या होत्या.लहानपणीच त्या धनुर्विद्या,आत्मसंरक्षण,घोडेस्वारी शिकल्या होत्या.

१८४२ रोजी,त्यांचा विवाह झाशीचे राजे,राजा गंगाधर राव यांच्याशी झाला होता.त्यांनी एका मुलाला जन्म दिले,पण दुर्दैवाने तो ४ महिन्यातच मृत्यु पावला.

१८५३, मध्ये आजारामुळे त्यांच्या पतीचाही मृत्य झाला.ते राज्याचा सगळा कारभार लक्ष्मीबाईवर सोडून गेले.

इंग्रजांना झाशी आपल्या नावावर करून घ्यायची होती व झाशीवर शासन करायचे होते.पण लक्ष्मीबाईंना हे मान्य नव्हते.त्या इंग्रजांविरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत लढल्या.

त्यांनी इतर बायकांना आणि लोकांना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले व त्यांना युद्धासाठी तयार केले. त्यांची निर्भयता,दृढनिश्चय,सैन्य कौशल्य पाहून इंग्रजसुद्धा घाबरून गेले होते.त्

यांनी इंग्रजांना जोरदार लढा दिला होता,पण दुर्दैवाने १८ जून, १८५८ मध्ये त्यांचा मृत्यु झाला.

Similar questions