essay on rainy season in Marathi
Answers
पावसाळा या विषयावरती काही बोलायच म्हटलं तरी मन शहरून येते.पावसाळा हा सर्व ऋतूंचा राजा आहे.टप-टप पडणारे पाण्याचे थेंब, काळेकुट्ट आभाळ, बेडकांचे आवाज आणि विजांचा गडगडाट हे सर्व ऐकतानाच खूप मजा येते.पाऊस सुरु झाल्यानंतर हातात चहा घेऊन खिडकीजवळ उभा राहून पावसाला बघत राहणे. थंड हवेच्या झुळूकेसोबत पाण्याचे आतमध्ये येणार्या थेंबांचा आस्वाद घेणे. या पेक्षा दुसरे सुख कोणते असेल बरे!
पावसाळा आपल्याकडे जवळपास जून माहिन्यात सुरू होतो.त्यावेळी तापलेल्या मातीवर जेव्हा थंड थंड पाण्याचे थेंब पडतात तेव्हा तो मातीचा सुगंध ज्याला आपण सौरभ म्हणून समजतो त्या वासाची तुलना जगातील कोणत्याच वासाची करता येणार नाही.पावसाळ्यात नद्या,नाले,ओढे अगदी तुडुंब भरूनवाहत असतात.त्यात पोहणे आणि मासे पकडणे हा छंद खूप सार्या लोकांना असतो.गणपती,गोपाळकाला असे अनेक सण या पावसाळ्यातच येतात.पावसाळ्यात खरी मजा येते तेव्हा जेव्हा अचानक घरातील वीज जाते.आणि विजांच्या कडकडाटात व घाबरलेल्या आविर्भावात आजीकडून भूतांच्या गोष्टी ऐकाव्यशा वाटतात.ते देखील चादरीत झोपून!
पाऊस जवळपास 4 महिन्यांनातर म्हणजेच सप्टेंबर किवा ऑक्टोबर मध्ये संपतो.पाऊस संपल्यानंतर सगळं मस्त वाटतं. धुराने आणि धुळीने माखलेल्या झाडांना नॅच्युरल बाथ मिळतो आणि आपल्याला नवीन रंग दिसू लागतात. आणि तो जगण्याची नवी अशा देतो निसर्गाला आणि आपल्याला.
धन्यवाद