Essay on samudra kinara in marathi
Answers
Answer :
नमस्कार मित्रांनो आज बघणार आहोत मी पाहीलेला समुद्र किनारा निबंध मराठी , अथांग निळा सागर, त्याच्या उसळणाऱ्या लाटा, त्यांच्यावर दिसणारा पांढरा फेस अशा या विलोभनीय दृश्याचे मला विलक्षण आकर्षण वाटते. त्या फेसाळणाऱ्या लाटा पुढे पुढे येतात आणि सागराच्या किनाऱ्याला शिवून मागे फिरतात, तेव्हा एक लाट केव्हा संपली आणि दुसरी केव्हा सुरू झाली हे उमगतच नाही. लाटांचा हा पाठशिवणीचा खेळ मनसोक्तपणे पाहावा हा माझा छंद. ओहोटीच्या वेळी पसरलेला तो अफाट मोठा वाळूचा किनारा आणि भरतीच्या वेळी त्याला गिळू पाहणारा तो सागर, हे परस्परांशी जणू गप्पाच मारीत आहेत असे मला वाटते. त्यांचा तो संवाद शब्दाविना असला तरी तो माझ्या मनाला उमगतो आणि मग अनेकदा मी समुद्राच्या सान्निध्यात जातो.
मला आवडतो तो मोकळा समुद्रकिनारा. अथांग सागर आणि त्याची विशाल पुळणी. मग तेथे मला गवसते उदात्तता, भव्यता. मन कधीही बेचैन झाले की मी समुद्राच्या सान्निध्यात जातो. त्याची ती भव्यता माझ्या मनातील कस्पटतेची मला जाणीव करून देते. माझ्या मनातील क्षुद्र अहंकार त्या लाटांच्या फेसाबरोबर वाहून जातो. मन निर्मल होते. मनाचे पिंजरे तुटून पडतात आणि भव्यता, उदात्तता मनाला व्यापून टाकते. स्वतःच्या क्षुल्लक दु:खांचा विसर पडतो आणि मग मन भोवतालची सुखे, आनंद, संतोष टिपू लागते. हात भोवतालच्या वाळूशी नकळतपणे खेळ खेळू लागतात. मुठीत धरलेली वाळू पाहता पाहता गळून पडते. सूर्यकिरणांत तिच्यातील सप्तरंग उठून दिसतात. मग त्या वाळूतील रंगीबेरंगी शंखशिपले डोळयांना मोहवू लागतात. एक सापडली, दुसरी सापडली असे करता करता दोन्ही हात भरून जातात. त्या शंखशिंपल्यांच्या रंगांत विविधता असते. प्रत्येकाचा आकार आगळावेगळा असतो. विधात्याच्या या निर्मितीने मन वेडावून जाते.
पण-पण असा हा माझा सागर, असा हा माझा रत्नाकर आता मुंबईत कोठे राहिला आहे? ती विशालता, ती अथांगता आज हरवून गेली आहे. समुद्रकिनारी मनाची शांतता शोधायला जावे, तर ती देखील आता तेथे लाभत नाही.
समुद्राचा विशाल पुळणीकाठ माणसाने हिरावून घेतला आहे. माणसाने आपला दिमाख दाखविण्यासाठी तेथे उंच इमारती उठविल्या आहेत. कुठे पोहण्याचे तलाव उभे राहिले आहेत, तर कुठे पंचतारांकित मोठमोठी हॉटेल्स उभारण्यात आली आहेत. तर कुठे समुद्रातील ते सुखी जीव-ते मासे-त्यांना कोंडून ठेवण्यासाठी मत्स्यालय उभारले आहे. उरल्यासुरल्या सांगरकिनाऱ्यावर भेळपुरीच्या गाड्यांनी आक्रमण केलेले आहे. आपले जिव्हालौल्य भागवून माणसे तेथे जो केरकचरा टाकतात त्यामध्ये माझी सागरातील रंगीबेरंगी रसिकता हरवून जाते.
एवढा तो विशाल रत्नाकर, त्याची तरी माणसाने काय स्थिती केली आहे? एकेकाळी रावणाने सीताहरण केले म्हणून या पयोधीला सेतूचे बंधन पडले ; तेव्हा कविमंडळी हळहळली. पण आज मोठमोठ्या शहरांतून गढूळ, दूषित पाणी या सागरालाच अर्पण केले जाते. आता तर आपल्या विज्ञानाची घमेंड येऊन मानव सागराच्या अंतःकरणातील स्नेहच हिरावून घेऊ पाहत आहे. या साऱ्या कर्तृत्वात शांत, उदात्त सागरसहवास मात्र संपला आहे आणि उरला आहे केवळ कोलाहल!
■■ समुद्रकिणाऱ्यावर निबंध■■
मला समुद्रकिणाऱ्यावर वेळ घालवायला फार आवडते.समुद्रकिणाऱ्याचा नजारा मनाला प्रसन्न करणारा असतो.
समुद्राकिणाऱ्यावरच्या वाळूवर बसून समुद्राकडे पाहत राहणे, तिथल्या पाण्याचा आवाज, तिथे वाहणारी थंड हवा, तिकडचा मनमोहक वातावरण हे सगळेच मला फार आवडते.
मी बऱ्याच वेळा माझ्या कुटुंबीयांसोबत वेगवेगळ्या समुद्रसमुद्रकिणाऱ्यावर फिरायला जाते. काही दिवस आगोदरच मी माझ्या आईसोबत गिरगाव समुद्रकिणाऱ्यावर गेलेले. हा समुद्रकिणारा मुंबईमध्ये प्रसिद्ध असून याला गिरगाव चौपाटी म्हणून ओळखले जाते.
हा समुद्रकिणारा फारच सुंदर आहे. इथे प्रत्येक वयोगटातील लोक वेळ घालवायला येतात. लोकांची गर्दी नेहमीच इथे पाहायला मिळते. इथे पानी पूरी, पाव भाजी आणि इतर खायच्या वस्तू विकणारे बरेच ठेले आहेत. तसेच खेळणी, फुगे, चहा विकणारे लोकं समुद्रकिणाऱ्यावर फिरत असतात.
या समुद्रकिणाऱ्यावर असलेले शांत,स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणमुळे लोक इथे येतात. आपल्या मित्र- मैत्रिणी व कुटुंबीयांसोबत बराच वेळ घालवतात.इथे येणाऱ्या सगळ्या लोकांना खूप आनंद मिळते.