essay on
शालासंवादः
Answers
अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांच्या जोडीने शिक्षण हीसुद्धा आज प्रत्येकाची गरज आहे. २०१२ सालच्या कायद्यानुसार शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क असून ६ ते १४ वर्षे वयोगटातील एकही मूल शाळेबाहेर राहणार नाही, ही सरकारची जबाबदारी आहे. मूल शाळेत येणं, शिकणं व टिकणं हे आज शिक्षणापुढील महत्त्वाचं उद्दिष्ट आहे.
जगभरामध्ये शिक्षणाची परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. काळानुसार शिक्षणशास्त्र विकसित होत गेले. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, अध्यापनपद्धती यांमध्ये स्थित्यंतरे होत गेली. मुलांच्या भावनिक, मानसिक, बौद्धिक विकासाच्या अनुषंगाने तसेच त्यासाठी पोषक बाबींचा, तंत्रांचा विचार आणि विस्तार होत गेला. हळूहळू शाळा ही संकल्पना अधिक दृढ होत गेली. मुलांना काय यायला हवं त्यानुसार त्यांनी काय काय शिकावं याचा प्रामुख्याने विचार शिक्षणात केला गेला.
एके काळी शाळा म्हणजे मुलांना डांबून ठेवणारे कोंडवाडे असत. कोमल बालमनाला भीती, धाक, शिक्षा या गोष्टी शिस्तीच्या नावाखाली सर्रासपणे केल्या जात. गुरुजी म्हणतील ती पूर्वदिशा. मुलांनी गप्प बसणे, प्रश्न न विचारणे, समजले असो किंवा नसो घोकंपट्टी करून पुस्तकातील उत्तरे जशीच्या तशी लिहिता येणं आणि त्यासाठी गुणांची कमाई करून हुशार ठरणं अशीच परिस्थिती होती. शाळा नावाच्या बंदिस्त चौकटीमध्ये सब घोडे बारा टक्के अशा सरधोपट पद्धतीने शिकवले जाई. मुलांचा कल, आवड, कुवत लक्षात घेऊन घडवणारे शिक्षक फार मोठ्या संख्येने नव्हते. अशाच पारंपरिक शाळांतून विद्यार्थ्यांची होणारी घुसमट लक्षात घेऊन कविवर्य टागोरांनी १९०१ मध्ये पाच मुलांना घेऊन शांतीनिकेतन ही मुक्तांगणरूपी शाळा सुरू केली.
please mark me as brainlist